भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) माजी महासंचालक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुबन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे शनिवारी, १० मे रोजी, कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथील कावेरी नदीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन त्यांच्या पत्नीसह म्हैसूरमध्ये राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना दोन मुलीही आहेत. अय्यप्पन हे ७ मे पासून बेपत्ता होते. अय्यप्पनची स्कूटरही कावेरी नदीच्या काठावर सापडली. श्रीरंगपट्टण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान; ऐन उन्हाळ्यात ओढ्यांना पूर तर नाशिकमध्ये 14 हजार शेतकऱ्यांचे नुकसान
डॉ. सुबन्ना अय्यपन हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत ज्यांना 2022 मध्ये ‘ब्लू रिव्होल्यूशन’साठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अय्यप्पनने एक मत्स्यपालन तंत्र विकसित केले ज्याने संपूर्ण भारतातील मत्स्यपालनाच्या जुन्या पद्धती बदलल्या. त्यांच्या कार्यामुळे गावकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली, अन्न सुरक्षा मजबूत झाली आणि किनारी आणि अंतर्गत प्रादेशिक उत्पादन वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अय्यप्पनचा जन्म १० डिसेंबर १९५५ रोजी येलंदूर, चामराजनगर, कर्नाटक येथे झाला. १९७५ मध्ये त्यांनी मत्स्यव्यवसाय शास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांनी मंगलोर येथून मत्स्यव्यवसाय शास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये बंगळुरू येथील कृषी विद्यापीठातून पीएचडी केली.
मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) आणि भुवनेश्वरमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर एक्वाकल्चर (CIFA) चे संचालक म्हणून काम केले. एवढेच नाही तर ते हैदराबादचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाचे (एनएफडीबी) अधिकारी देखील होते. त्यांनी कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) सचिव म्हणूनही काम पाहिले. त्यांनी राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी मान्यता मंडळ (NABL) चे अध्यक्ष आणि इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठ (CAU) चे कुलगुरू म्हणूनही काम केले आहे.