नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेस आतापर्यंत भारत सरकारला पाठिंबा दिला आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकमताने केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणाही झाली. युद्धविरामाच्या घोषणेनंतर तीन दिवसांनी म्हणजे सोमवारी ( १२ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे.
पंतप्रधानांच्या भाषणाबाबत काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपूर्ण भाषणात एकदाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर एकही शब्द उच्चारला नाही. आता विरोधी पक्ष या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे आणि भाजपला धारेवर धरले आहे.
पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच; सांबा जिल्ह्यात दिसले संशयित ड्रोन, सुरक्षा यंत्रणांना समजताच…
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींकडे सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. “भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे जयराम रमेश यांनी सोशल मीडिया एक्स वर पोस्ट करत पंंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ”
पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून करण्यात येणारे भाषण बऱ्याच काळापासून पुढे ढकलले जात होते. मात्र, अध्यक्ष ट्रम्प यांनी काही मिनिटांपूर्वी केलेल्या घोषणांमुळे ते पूर्णपणे झाकोळले गेले. पंतप्रधानांनी त्यावर एकही शब्द बोललेला नाही.भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीला मान्यता दिली आहे का? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा एखाद्या तटस्थ ठिकाणी होण्यास भारत तयार झाला आहे का? आता भारत अमेरिकेच्या या मागण्यांना मान्यता देणार का — जसे की ऑटोमोबाईल, कृषी आणि अन्य क्षेत्रांतील बाजारपेठा उघडणे?
पंतप्रधानांनी तात्काळ सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली पाहिजे — जे त्यांनी मागील वीस दिवसांपासून मुद्दाम टाळले आहे. पुढील महिने सावध कूटनीती आणि सामूहिक निर्धाराची गरज भासवतील. केवळ एखाद-दोन ओळी बोलून या काळातील गंभीर गरजा भागवता येणार नाहीत. आपल्या सशस्त्र सैन्यांना आम्ही निःशर्त सलाम करतो आणि त्यांचा सन्मान करतो. त्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी १००% आहोत. मात्र पंतप्रधानांनी अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची बाकी आहेत.
Taliban Bans Chess : तालिबानने अफगाणिस्तानात चक्क बुद्धिबळावर घातली बंदी; बुद्धीबळ महासंघही बरखास्त
दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी काही वेळापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं होतं, “मी दोघांनाही (भारत आणि पाकिस्तान) सांगितलं की हे थांबवा, आणि जर थांबवलं नाही, तर आम्ही व्यापार करणार नाही. त्यानंतर अचानक दोघांनीही सांगितलं की ते थांबत आहेत. अमेरिकेने व्यापाराच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर दबाव टाकून सीमावर्ती गोळीबार थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.