Big News: सुरक्षा यंत्रणांनी 3 नक्षलवाद्यांना ठोकलं; छत्तीसगडमध्ये चकमकीचा थरार, 300 जवानांचा जंगलाला वेढा
रायपूर: गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सातत्याने सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झालेली पाहायला मिळते. दरम्यान छत्तीसगडमध्ये अशीच एक चकमक सुरक्षा यंत्रणामध्ये झाली आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा यंत्रणेने 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सोरेनाम जंगलात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी आमनेसामने आले. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा यंत्रणेने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 नक्षलवादी मारले गेले. डीआरजी आणि एस्टीफ जवनांनी अजूनही सोरेनाम जंगलाला वेढा घातला असल्याचे समजते आहे. जवळजवळ 300 पेक्षा जास्त जवान हे या कारवाईत सहभागी असून त्यांनी संपूर्ण जंगल वेढले आहे. नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणेने या कारवाईत तीन नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले आहे. तसेच अनेक ऑटोमेटिक शस्त्र जप्त केली आहेत. तसेच मारलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हे नक्षलवादी बस्तर मधून आल्याचे समोर आले आहे. बस्तर पाठोपाठ या भागात नक्षलवादी आपले नेटवर्क वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. चमक झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सर्च ऑपरेशन राबवत आहे. या जंगलात आणखी नक्षलवादी लपले असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याआधी गृहमंत्री अमित शहा हे छत्तीसगड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सुरक्षा यंत्रणेला नक्षलवादाविरोधातील कारवाई आणखी कडक करण्याचे निर्देश दिले होते. तसेच नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे राज्य सरकारच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणा मोठ यश मिळालं आहे. नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा अभियान सुरु आहे. यामध्ये नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी सुरक्षा दलाला मोठे यश आले. सीमेवर चकमकीमध्ये सुरक्षा यंत्रणांनी शौर्य दाखवत 30 नक्षलवादींचा खात्मा केला आहे. घटनास्थळावर 600 जवान तैनात करण्यात आले असून या ठिकाणी जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली आहेत.
हेही वाचा: छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश! 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, 600 जवान तैनात
छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात अबूझमाड येथे नक्षलवाद्यांसोबतची चकमक येथे झाली. हा परिसर सीमाभागात येत असून या क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी कारवाई केली. यामध्ये नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांकडे AK 47 देखील असल्याचे समोर आले आहे. या चकमकीनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दंतेवाडा बॉर्डरवर नक्षलवाद्यांची कुमूक आल्याबाबत सुरक्षा यंत्रणांना खबऱ्यांकडून टिप ऑफ मिळाला होता. अंधार झाल्यानंतर गोळीबार थांबवण्यात आला होता. पण दोन्ही बाजूंनी सुरक्षा यंत्रणां पोझिशन घेऊनच थांबल्या होत्या.