लंडन : इंग्लंडमध्ये (England) राहणाऱ्या एका भारतीय (Indian) वंशाच्या तरुणानं लज्जास्पद गोष्ट केली आहे. या भारतीय तरुण विद्यार्थ्यानं (Student) इंग्लंडमधील एका महिलेला आपल्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केलाय. ही महिला मद्यधुंद अवस्थेत बेशुद्धावस्थेत होती. सीसीटीव्ही फुटेज आणि या महिलेनं दिलेल्या साक्षीच्या आधारावर या तरुणाला अटक करण्यात आलीय. हा तरुण या महिलेला वर्षभरापूर्वी एका क्लबमध्ये भेटला होता. त्यावेळची ही घटना आहे.
तरुणानं बलात्कार केला
इंग्लंडमध्ये भारतीय वंशांचा २० वर्षीय प्रीत विकल राहतो. गेल्या वर्षी जूनमध्ये कार्फिड शहरात एका ब्रिटन तरुणीला मद्यधुंद अवस्थेत असताना फ्लॅटवर नेले. तिथं तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. प्रीत आणि ही तरुणी वेगवेगळ्या ग्रुपसोबत कार्फिडमध्ये नाईट पार्टीसाठी गेले होते, तिथं त्यांची एकमेकांशी गाठ पडली होती.
प्रचंड नशेत असलेली महिला प्रीतसोबत गेली
तरुणीनं या पार्टीत प्रचंड मद्यपान केलं होतं. रात्री उशिरा हे दोघंही आपआपल्या ग्रुपसोबत बाहेर पडले. हे दोघं एकमेकांशी गप्पा मारत त्यांच्या ग्रुप्सपासून बाजूला पडले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेला प्रीतनं खांद्याचा आधार दिला. नंतर तिला हातानं उचलून घेतलं नंतर तिला खांद्यावर टाकून तिला तो फ्लॅटवर घेऊन आला. हा तरुण या महिलेला घेऊन रस्त्यानं जात असतानाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागलेला आहे. याबाबत ट्विट करत पोलिासंनी या प्रकरणात प्रीतला तुरुंगात पाठवल्याचं लिहिलं आहे. अशा प्रकारच्या घटना शहरात घडत नाहीत. मात्र प्रीत विकल हा धोकादायक व्यक्ती असल्याचं पोलिसांनी लिहिलंय. एका मद्यधुंद आणि कमकुवत मुलीचा त्यानं फायदा उचलल्याचं लिहिण्यात आलंय.
महिलेच्या तक्रारीनंतर अटक
या घटनेनंतर महिलेनं सांगितलं की ती झोपू शकत नव्हती. या प्रकारानं ती धास्तावली होती. ती स्वताला दोषी मानू लागली होती. त्यानंतर तिनं तक्रार केली सीसीटीव्हीच्या आधारानं तिनं प्रीतची ओळख प़टवली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.