ED येताच बरमुड्यावरच पळू लागला 'हा' आमदार; CRPF च्या जवानांनी अलगदपणे...; पहा Video
West Bengal: पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीने सत्ताधारी टीएमसीच्या आमदारावर छापेमारी केली आहे. ईडीने आपला मोर्चा पश्चिम बंगालमध्ये वळवला आहे. ईडीने आज सत्ताधारी टीएमसीचे आमदार जीवन कृष्णा साहा यांच्या घरी छापेमारी केली. तेव्हाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
बुरवान येथील टीएमसी आमदार जीवन कृष्णा साहा यांच्यावर शाळांमध्ये शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीने जेव्हा छापेमारी केली तेव्हा आमदार जीवन कृष्णा साहा आपल्या घरीच असल्याचे समोर आले आहे.
ईडीचे अधिकारी घरी आलेले पाहताच आमदार साहा यांना घराच्या भिंतीवरून आहे त्याच कपड्यांमध्ये उडी मारून पळ काढला. याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यानी त्यांना अगदी अलगदपणे पकडले. सीआरपीएफ जवानांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतले.
#WATCH | Murshidabad, West Bengal | Enforcement Directorate arrests TMC MLA Jiban Krishna Saha in connection with SSC (Asst Teacher) Scam pic.twitter.com/vvri129RKy
— ANI (@ANI) August 25, 2025
ईडीने आमदार साहा यांना अटक केल्यावर त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते शॉर्ट्सवरच असल्याचे दिसून येत आहेत. ईडीचे अधिकारी आलेले कळताच त्यांनी भिंतीवरून उडी मारून पळून जायचं प्रयत्न केला. मात्र सीआरपीएफच्या जवानांनी त्यांना तत्काळ पकडून ताब्यात घेतले.
या आमदाराने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या घराजवळ असणाऱ्या एका तलावात आपला मोबाइल फोन फेकून दिला. तलावांतून दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. सध्या आमदार जीवन साहा यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ही छापेमारी शिक्षक भरती घोटाळ्यातील भ्रष्टाचाराशी संबंधित आहे
आधी सीबीआयकडून अटक
विशेष बाब म्हणजे आमदार जीवन कृष्णा साहा यांना सीबीआयने देखील अटक केली होती. 2024 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली होती. सध्या त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आहे. सीबीआय आमदार साहा यांची चौकशी करत आहेत. त्यातच आता ईडीने देखील त्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. त्यांची चौकशी आता ईडी देखील करणार आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
ED Raid: 12 कोटी रोख, सोने-चांदी, परकीय चलन…; काँग्रेस आमदाराच्या कारवाईत ईडीला सापडलं घबाड
काँग्रेस आमदाराच्या कारवाईत ईडीला सापडलं घबाड
कर्नाटकचे काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने वीरेंद्र यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली. या कारवाई १२ कोटींहून अधिक रोख रक्कम, सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक कोटींहून अधिक रुपयांचे परकीय चलनदेखील जप्त कऱण्यात आले आहेत .