Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election Date : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; या दिवशी होणार मतदान, या तारखेला निकाल?

Delhi Election Date Updates : गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मतदान आणि निकालाची तारीख जाहीर केली.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 07, 2025 | 05:47 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; या दिवशी होणार मतदान?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; या दिवशी होणार मतदान?

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Election 2025 Date : गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मतदान आणि निकालाची तारीख जाहीर केली. दिल्ली विधानसभेसाठी ५ फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे तर ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.  नव्या वर्षात दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पहायला मिळतं. प्रत्येक संस्कृतीचं दर्शन दिल्लीत होतं. त्यामुळे दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली.

Delhi Election 2025

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याबाबतची घोषणा करतील. १८ फेब्रुवारीला ते निवृत्त होणार आहेत.

Asaram Bapu: मोठी बातमी! अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जामीन, SC चा निर्णय; मात्र…

दिल्लीत १.५ कोटी हून अधिक मतदार आहेत. २.०८ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी होणार आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत गेले आहेत. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेसनेही आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.

Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभेआधी केजरीवालांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “येत्या काळात सिसोदियांच्या…”

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपने सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. मात्र यावेळी आपला भाजपचं मोठं आव्हान असणार आहे. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही असल्यांच वक्तव्य केलं. त्यामुळे दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतं आहे. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याविषयी भाजपचे उमेदवार रमेश दिबुडी यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यामुळेही दिल्लीचं राजकारण तापलं आहे. त्याला आतिशी यांनीही जशाच जसं उत्तर दिलं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Election commission of india announces delhi assembly election dates delhi election voting 5 february and delhi election result 8 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Delhi Election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.