Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी; लवकरच तारीख जाहीर केली जाणार

जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2025 | 08:30 AM
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी; लवकरच तारीख जाहीर केली जाणार

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी; लवकरच तारीख जाहीर केली जाणार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने बुधवारी ही माहिती दिली. आयोगाने सांगितले की, गृह मंत्रालयाने 22 जुलै रोजी धनखड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. त्यामुळे आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

संविधानाच्या कलम ६८ अंतर्गत, उपराष्ट्रपतिपद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे, नियमांनुसार ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागते. या संदर्भात, निवडणूक आयोगाने आता एक अधिसूचना जारी केली आहे. उपराष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा आणि राज्यसभा) निवडून आलेले आणि नामांकित सदस्य असतात. उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला किमान २० प्रस्तावक आणि २० समर्थक (निर्वाचक मंडळाचे सदस्य) यांचे समर्थन आवश्यक असते. त्यांना नामांकनासोबत ५०००० रुपयांची सुरक्षा रक्कम देखील जमा करावी लागते.

हेदेखील वाचा : सभागृहातील गेम करणार का माणिकराव कोकाटेंचा ‘Game’? हातातून जाणार खातं, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, उपराष्ट्रपती बनण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा. वय किमान ३५ वर्षे असावे. तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा. तो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा केंद्र/राज्य सरकारचे मंत्री पद वगळता कोणतेही लाभाचे पद धारण करू शकत नाही.

वैद्यकीय कारणास्तव दिला होता राजीनामा

जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र, हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

हेदेखील वाचा : Parliament Monsoon Session 2025: संसदेचा तिसरा दिवसही वादळी; SIRवरून विरोधक आक्रमक

उपराष्ट्रपतिपदासाठी अनेक नावं चर्चेत

भाजपच्या अंतर्गत गोटात देखील काही वरिष्ठ नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यात जे.पी. नड्डा, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, मनोज सिन्हा आणि वसुंधरा राजे यांचा समावेश आहे. मात्र, या कोणत्याही नावामध्ये सर्व राजकीय समीकरणे संतुलित करण्याची क्षमता दिसून येत नसल्याची चर्चा आहे. मार्च 2025 मध्ये जे.पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध त्यांना एक संभाव्य उमेदवार बनवतात. मनोज सिन्हा यांचे नाव देखील झपाट्याने पुढे येत असले, तरी जातीय समीकरण त्यांच्या बाजूने नसल्याचे बोलले जाते.

Web Title: Election commission prepares for vice presidential election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • Election Commission
  • Jagdeep Dhankhar
  • Vice Presidential Election

संबंधित बातम्या

Bihar Elections: बिहारमध्ये निवडणूक आयोगाचं पितळ पडलं उघडं; महिलांना ओळखपत्र असूनही बजावता आला नाही मतदानाचा हक्क
1

Bihar Elections: बिहारमध्ये निवडणूक आयोगाचं पितळ पडलं उघडं; महिलांना ओळखपत्र असूनही बजावता आला नाही मतदानाचा हक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.