'हा जोकर तर अर्धा दिवस व्हिडिओ गेम खेळतो'; आठवड्याला १२० तास कामावरून एलॉन मस्क ट्रोल
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम केलं पाहिजे असं विधान केलं होतं. त्यानंतर कामाच्या तासावरून उद्योगविश्वात दोन गट निर्माण झाले आहेत. आता तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी DOGE म्हणजेच अमेरिकेच्या सरकारी विभागातील कर्मचारी आठवड्याला १२० तास काम करतात असा दावा केला आहे. तर ४० तास काम करणारे तोट्यात असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.
सोशल मीडियावर सध्या दोन गट आहेत. दोन्ही गट उद्योग क्षेत्रातील आहेत. एक गट जास्त कामाच्या तासांना पाठिंबा देतो आणि दुसरा गट आठवड्याला जास्तीत जास्त वेळ काम करण्याची भाषा करतो. आणि आता या दुसऱ्या गटात एलॉन मस्क यांची भर पडली आहे. अलीकडेच इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कामाच्या तासावरून विधानं केली होती. त्यानंतर त्यांना यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे.
एलॉन मस्क यांनी व्यावसायिकांना जास्त तास काम करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, म्हटलं आहे की, DOGE, किंवा ते ज्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे नेतृत्व करतात, त्यात असे लोक आहेत जे आठवड्याला १२० तास काम करतात.
मात्र मस्क यांनी केलेल्या दाव्याचा हिशोब मांडला तर अमेरिकेच्या सरकारी विभागातील लोक दररोज १७ तास काम करतात, आराम करण्यासाठी कोणताही वीकेंड न घेता. किंवा ते सलग पाच दिवस २४ तास काम करतात, झोपायलाही वेळ देत नाहीत.
DOGE आठवड्यातून १२० तास काम करत आहे. आमचे नोकरशाही विरोधक आठवड्यातून ४० तास काम करतात. म्हणूनच ते इतक्या लवकर तोट्यात आहेत,” असे डेमोक्रॅटीक पक्षावर निशाणा साधताना म्हटलं आहे. मस्कच्या अनुयायांनी इतके तास काम केल्याने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक परिणामांकडे लक्ष वेधले तेव्हा X वर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे.
“फेड गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना, मला कळले की अनधिकृत ओव्हरटाईम करणे बेकायदेशीर आहे. असे केल्याने सरकारला पैसे द्यावे लागतात आणि गुलामगिरी बेकायदेशीर आहे. मग DOGE मधील फेडरल कर्मचारी कायदेशीररित्या इतके तास कसं घालवत आहेत? ते पण अनेक शिफ्ट?” असं एका युजर्सने विचारलं आहे.
काहींनी मस्कच्या स्वतःच्या कामाच्या नीतिमत्तेवर टीका केली. “हा जोकर अर्धा दिवस व्हिडिओ गेम खेळतो तर उरलेला अर्धा वेळ तो ट्विट करण्यात घालवतो. पृथ्वीवरील कोणीही असा विश्वास ठेवत नाही की हा माणूस आठवड्यातून १२० तास काम करतो. जास्तीत जास्त तो कदाचित दिवसातून २ पूर्ण तास प्रत्यक्ष काम करत असेल,” असा टोला एका युजर्सने लगावला आहे.