महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदी फेकून दिले, खासदार जया बच्चन यांचा सनसनाटी आरोप
महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. दरम्यान मृताचां आकडा लपवला जात असल्याचा आरोप होत असताना आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्च यांनी खळबळजनक दावा केला आहे. चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदीत फेकून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Rahul Gandhi : …अन्यथा भारतात AI क्रांती अशक्य? राहुल गांधींनी संसदेत मांडला मुद्दा
प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला, त्या म्हणाल्या की, “नदीत मृतदेह फेकून देण्यात आले, त्यामुळे नंदीचं पाणी अधिकच दूषित झालं आहे” राज्यसभेत शून्य प्रहरात जलशक्तीवरील चर्चेवर संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना जया बच्चन यांनी हे उत्तर दिलं आहे.
“सध्या सर्वात जास्त दूषित पाणी कुठे आहे? ते कुंभमेळ्यात आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आहेत ज्यामुळे पाणी दूषित झाले आहे. खऱ्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही,” महाकुंभाला भेट देणाऱ्या सामान्य किंवा गरीब लोकांना पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही, तर व्हीआयपींना विशेष वागणूक मिळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
“कुंभाला भेट देणाऱ्या सामान्य लोकांना कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही, त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही,” महाकुंभातील मोठ्या संख्येने लोक जमल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाल्या, “ते खोटे बोलत आहेत की कोट्यवधी लोक त्या ठिकाणी भेट देतात, कोणत्याहीवेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी कसे जमू शकतात?”
आजच्या सुरुवातीला, महाकुंभातील चेंगराचेंगरी प्रकरणावरून लोकसभेत जोरदार निदर्शने झाली कारण विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची आणि मृतांची यादी देण्याची मागणी केली. विरोधी पक्षांनी गोंधळाचे निदर्शने आणि घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला. काँग्रेस नेते गौरव गोगोई आणि के.सी. वेणुगोपाल यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी केली आणि चेंगराचेंगरीवर चर्चा करण्याची मागणी केली.”माननीय राष्ट्रपतींनी महाकुंभातील दुर्घटनेचा उल्लेख केला होता. तुम्ही चर्चेदरम्यान तुमचे मुद्दे उपस्थित करू शकता,” असे सभापती ओम बिर्ला यांनी उत्तर दिले.