Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात अचानक का थांबवलं चॉपर ?

श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) हे आपल्या खाजगी हेलिकॉप्टरने बँगलोरवरून तिरुपूरला जात होते. यावेळी रविशंकर यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे दोन सहाय्यक आणि वैमानिक इतकेच जण होते.

  • By साधना
Updated On: Jan 25, 2023 | 03:43 PM
sri sri ravishankar helicopter emergency landing

sri sri ravishankar helicopter emergency landing

Follow Us
Close
Follow Us:

इरोड: आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing Of Helicopter) करण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. इथल्या सत्यमंगलम टायगर रिझर्व्ह (एसटीआर) (STR) भागातील एका आदिवासी पाड्याजवळ उकिनियममध्ये श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या चॉपरचं इमर्जन्सी लँडिंग(Sri Sri Ravi Shankar Helicopter Emergency landing) करण्यात आलं.

[read_also content=”चार भावांनी चुलतभावाचं अख्खं कुटुंब संपवलं, दौंडचं भिमानदीत ७ जणांचं भीषण हत्याकांड का घडलं? पोलिसांनी सांगितलं खरं कारण; सख्या चार भावांना व बहिणीला ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/maharashtra/murder-of-those-seven-out-of-anger-over-childs-death-rural-police-shackled-sakyas-four-brothers-and-sister-364426.html”]

कदम्बुर पोलिसांनी माहिती दिली की, रविशंकर आणि हेलिकॉप्टरमध्ये बसलेले अन्य तिघे जण सुरक्षित आहेत. काही वेळ हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग करुन थांबवण्यात आलं होतं. मात्र पुढे मग 50 मिनिटांनी हवामान नीट झाल्यानंतर हेलिकॉप्टरचं उड्डाण करण्यात आलं. कोणालाही काहीही त्रास झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर हे आपल्या खाजगी हेलिकॉप्टरने बँगलोरवरून तिरुपूरला जात होते. यावेळी रविशंकर यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे दोन सहाय्यक आणि वैमानिक इतकेच जण होते. कदम्बुरचे पोलीस निरीक्षक सी वडिवेल कुमार म्हणाले की, ‘जेव्हा हेलिकॉप्टर सकाळी 10.15 वाजता निघालं तेव्हा अचानक हवामान खराब असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे वैमानिक पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे उकिनियममध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. काही वेळासाठी हे लँडिंग करण्यात आलं होतं.

माजी सीपीआय आमदार पी एल सुंदरम यांच्या सांगण्यावरून उकिनियम गावात पोहोचलेल्या तामिळनाडू पझांगुडी मक्कल संगमचे राज्याचे कोषाध्यक्ष के रामासामी यांनी सांगितलं की आम्ही तिथे पोहोचेपर्यंत हेलिकॉप्टरला पुढे जाण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्यांनी सांगितलं की, हेलिकॉप्टर गावामध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ थांबलं होतं. त्यानंतर 11.30ला ते तिरुपूरसाठी रवाना झालं. वेळीच या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याने धोका टळला, अशी भावना या घटनेवर व्यक्त केली जात आहे. जर खराब हवामानातही वैमानिक हेलिकॉप्टर चालवत राहिला असता तर भयानक परिस्थिती ओढवू शकली असती. मात्र तसे न झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Emergency landing of sri sri ravishankars helicopter nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2023 | 03:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.