प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या
ईडीने दाखल केला गुन्हा
अनिल अंबानींच्या टीमने आरोपाचे केले खंडन
ED File Case Against Anil Ambani: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता ईडीने अनिल अंबानी यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने रिलायन्स कम्युनिकेशनविरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2,929 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अनिल अंबानी यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल अंबानी यायांच्या अडचणी वाढल्या आहे. हा गुन्हा सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर आधारित आहे.
ऑगस्ट महिन्यात सीबीआयने एसबीआयमध्ये फसवणूक झाल्याच्या प्रकरणात आरकॉम, अंबानी व काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयने मध्यंतरी अंबानी यांचे ऑफिस आणि काही अन्य ठिकाणी छापेमारी देखील केली होती. दरम्यान अनिल अंबानी यांच्या टीमने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणात आम्हाला जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. आज दुपारी अनिल अंबानी यांच्या घराची तपासणी पूर्ण झाली. एसबीआयने दाखल केलेली तक्रार ही 10 वर्षांपूर्वीची आहे. ईडीने आपल्या तपासचा वेग वाढवला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सला दिल्या गेलेल्या कर्जाची माहिती प्राप्त करण्यासाठी ईडीने अनेक बँकांना पत्र लिहिले आहे. ऑगस्ट महिन्यात 17 हजार कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्यात रिलायन्स ग्रुपच्या अनेक अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आहे.
आरकॉमसाठी एसबीआयकडून कर्ज सुविधा मिळविण्यासाठी आरोपींनी गुन्हेगारी कट रचला आणि त्यांचा गैरवापर केला, ज्यामुळे बँकेला २,९२९.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप आहे. कर्ज निधीचा गैरवापर किंवा इतरत्र वळवणे, कंपनींमधील कर्ज व्यवहार, विक्री चलन वित्तपुरवठ्याचा गैरवापर, रिलायन्स इन्फ्राटेल लिमिटेडने आरकॉम बिलांमध्ये सूट देणे, आंतर-कॉर्पोरेट ठेवींद्वारे निधीची हालचाल, सिटीझन इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडला दिलेल्या भांडवली आगाऊ रक्कम राईट ऑफ करणे आणि बनावट कर्जदारांची निर्मिती किंवा राईट ऑफ करणे या आरोपांमध्ये हे प्रकरण समाविष्ट आहे. २१ ऑगस्ट रोजी हा खटला दाखल करण्यात आला.
एसबीआय बँक घोटाळ्यातील सर्व आरोप अनिल अंबानी यांनी फेटाळले, CBI बद्दल केल ‘हे’ विधान
रिलायन्स ग्रुपच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंबानी यांनी एसबीआयच्या घोषणेला योग्य न्यायालयीन मंचात आव्हान दिले आहे आणि ते सर्व आरोप पूर्णपणे नाकारत योग्यरित्या स्वतःचा बचाव करतील. आरोपींवर गुन्हेगारी कट, फसवणूक आणि विश्वासघात यासारख्या गुन्ह्यांचा आरोप आहे. सीबीआयला २२ ऑगस्ट २०२५ रोजी सीबीआय, मुंबईच्या विशेष न्यायाधीशांकडून शोध वॉरंट मिळाले. शनिवारी कंपनीच्या कार्यालयात आणि अनिल अंबानी यांच्या निवासी परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली होती.