Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EVM Hacking Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होतोय EVM हॅकिंगचा व्हिडीओ; निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं

मतदारांना मतदान करण्यासाठी बटण दाबावे लागते. मतदान केंद्रावर हल्ला झाल्यास बनावट मतदान होऊ नये यासाठी मतदान अधिकारी बटण दाबून मशीन बंद करू शकतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 01, 2024 | 03:07 PM
EVM Hacking Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होतोय  EVM हॅकिंगचा व्हिडीओ; निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून इव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. निवडणुकांपूर्वीपासूनही इव्हीएम हॅक होत असल्याच्या चर्चाही सुरू होत्या.   उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यातच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून इव्हीएमचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्या व्हिडीओच्या आधारे अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये एक हॅकरने  इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो, असा दावा केला आहे.  हा व्हिडिओ अनेक लोकांनी आणि काही राजकीय नेत्यांनीही शेअर केला आहे.

हा व्हिडिओ ‘ एका वृत्तवाहिनीच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन स्टोरी’ चा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी या वृत्तपत्राच्या पत्रकारांनी एका वरिष्ठ खासदारासाठी काम करणारे गुप्त अधिकारी असल्याचे सांगून हे म्हणून स्टिंग ऑपरेशन केले. या व्हीडोओमध्ये अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने तो यूएस डिफेन्स डिपार्टमेंटच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक करू शकतो आणि त्यासाठी त्याने 54 कोटी रुपयांची मागणीही केली होती.

Delhi Election 2025: दिल्ली निवडणुकांबाबत केजरीवालांचे मोठे विधान; ‘आम्ही कोणत्याही पक्षाशी…’

 महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दावे फेटाळले

ही बाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक निवेदन जारी केले आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आयोगाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला  हे दावे पूर्णपणे निराधार, खोटे आणि सिद्ध न झालेले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

ईव्हीएम छेडछाड प्रतिबंधक

भारतीय न्यायिक संहिता, 2023 च्या कलम 318/4 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 43 (सी) आणि कलम 66 (डी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ईव्हीएम पूर्णपणे छेडछाड प्रतिबंधक असून ते कोणत्याही नेटवर्कशी जोडले जाऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकवेळा ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला आहे.

शरद पोंक्षे यांचं ‘पुरूष’ नाटक रंगभूमी गाजवणार, चाळीस वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार रंगमंच

 2019 मध्येही त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर

भारताच्या निवडणूक आयोगाने EVM वरील कोणत्याही शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर तपशीलवार FAQ प्रकाशित केले आहेत. खोट्या दाव्यांशी संबंधित अशाच एका घटनेत, दुसऱ्या देशात लपून बसलेल्या त्याच व्यक्तीविरुद्ध निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 2019 मध्ये दिल्लीत एफआयआर नोंदवण्यात आला होता.

कसे काम करते EVM?

मतदारांना मतदान करण्यासाठी बटण दाबावे लागते. मतदान केंद्रावर हल्ला झाल्यास बनावट मतदान होऊ नये यासाठी मतदान अधिकारी बटण दाबून मशीन बंद करू शकतात. मतदानाशी संबंधित नोंदी ठेवणाऱ्या मशीनवर मेणाचा थर लावला जातो. यासोबतच निवडणूक आयोगाकडून येणारी एक चिप आणि अनुक्रमांकही त्यासोबत देण्यात आलेला असतो.   या मशीनचा वापर आतापर्यंत 113 विधानसभा निवडणुकीत करण्यात आला आहे. या मशिन्सच्या वापराने मतमोजणी लवकर होते. लोकसभा निवडणुकीतील मते केवळ तीन ते पाच तासांत मोजली जाऊ शकतात, तर बॅलेट पेपरच्या काळात हेच काम करण्यासाठी 40 तास लागायचे. यासह, मशीन बनावट मते वेगळे करते, ज्यामुळे अशा मतांची मोजणी करताना लागणारा वेळ आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

या विषयावरील संशोधनातून असे समोर आले आहे की, मतदान यंत्राच्या वापरामुळे निवडणूक घोटाळे आणि मानवी चुका कमी झाल्या आहेत, ज्याचा लोकशाहीला फायदा झाला आहे.शिशिर देबनाथ, मुदित कपूर आणि शमिका रवी या संशोधकांनी 2017 मधील विधानसभा निवडणुकांशी संबंधित डेटावर संशोधन केल्यानंतर मतदान यंत्रांवर होणाऱ्या परिणामांवर शोधनिबंध सादर केला होता.त्यांच्या संशोधनादरम्यान, या संशोधकांना असे आढळून आले की मतदान यंत्राच्या वापरामुळे निवडणुकीतील अनियमितता कमी झाली आहे, ज्यामुळे गरीबांना खुले मतदान करण्यास मदत झाली आहे आणि निवडणुका अधिक स्पर्धात्मक झाल्या आहेत.

Web Title: Evm hacking video is viral on social media nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 03:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.