Photo Credit- Social Media दिल्ली निवडणुकांबाबत अरविंद केजरीवालांचे मोठे विधान
नवी दिल्ली : दिल्लीच्या उत्तर नगरमधून आम आदमी पक्षाचे दोन टर्म आमदार नरेश बल्यान यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अवघ्या एका दिवसांत पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुका 2025 संदर्भात मोठे विधान केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही आम्ही कोणतीही युती करत नाही. दिल्लीतील सर्व जागांवर आप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजपला दिल्लीत परिवर्तन यात्रा काढू द्या, लोकशाहीत तसे करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत कोणीही काहीही करू शकतो.
आपचे आमदार नरेश बलियांन यांच्या अटकेबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, उत्तम नगरमधील माझे आमदार नरेश बलियान यांना 30 नोव्हेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती. ते गुंडाच्या विरोधात सातत्याने तक्रारी करत होते. आता त्यांच्या मुलालाही टार्गेट करण्यात आले आहे. बलियांना यांना धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे घ्या आणि ते आम्हाला द्या, असे आदेश गुंड कपिल सांगवानने या गुंडांना सांगितले होते. पण या गुंडावर कारवाई करण्याऐवजी दिल्ली पोलिसांनी बलियान यांनाच अटक केली.
Arvind Kejriwal Attack:अरविंद केजरीवालांवर जीवघेणा हल्ला; दिल्लीत नेमकं झालं काय?
फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत चौथ्यांदा दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी ‘आप’ जोरदार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, यावेळी भाजप आणि काँग्रेसचे नेतेही आपच्या विरोधात आक्रमक वृत्तीत दिसत आहेत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.
दरम्यान, काल रात्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी (30 नोव्हेंबर) संध्याकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलाश परिसरात पुन्हा एकदा हल्ला झाला. पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर एक द्रव पदार्थ फेकला. त्याचवेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा पथकाने त्याला तत्काळ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पण या घटनेनंतर राजधानीत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
Pakistan News: पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान हिंसाचारात दोषी; न्यायालकडून ठोस पुरावे सादर
या घटनेनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या पॉश भागात असलेल्या पंचशीलमध्ये एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती, आज आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंब शोकाकुल आहे. दिल्लीत आजकाल ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, समाजातील प्रत्येक घटकातील लोक गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. गृहमंत्री अमित शहा यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
गेल्या 35 मधील हा तिसरा हल्ला असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबरला विकासपुरी, 27 नोव्हेंबरला नांगलोई आणि आज 30 नोव्हेंबरला ग्रेटर कैलासमध्ये हल्ला झाला होता. भाजपला केजरीवालांना मारायचे आहे का? हल्लेखोरांवर कारवाई का होत नाही? असाही हल्लाबोल आपकडून करण्यात आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या रोज प्रवास करत आहेत. आज ते ग्रेटर कैलासमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते. पण त्याच ठिकाणी त्यांच्यावर असा हल्ला झाला. या हल्ल्यामागे ‘आप’ने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप अपयशी ठरली. या हल्ल्या गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश उघड झाले आहे.
भारतीय ड्रोन कंपनीचे ड्रॅगनवर गंभीर आरोप; चीनने ‘Intellectual Property’ चोरल्याचा आळ