Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonu Nigam On Jaya Bachchan: “अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला

Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2025 | 03:19 PM
Sonu Nigam On Jaya Bacchan: "अमिताभजी त्यांना ..."; खासदारांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला

Sonu Nigam On Jaya Bacchan: "अमिताभजी त्यांना ..."; खासदारांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. दरम्यान महाकुंभमध्ये काही दिवसांपूर्वी चेंगराचेंगरी झाली होती. महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. दरम्यान मृताचां आकडा लपवला जात असल्याचा आरोप होत असताना आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्च यांनी खळबळजनक दावा केला आहे. चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदीत फेकून दिल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून आता राजकारण तापले आहे. यावर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला, त्या म्हणाल्या की, “नदीत मृतदेह फेकून देण्यात आले, त्यामुळे नंदीचं पाणी अधिकच दूषित झालं आहे” राज्यसभेत शून्य प्रहरात जलशक्तीवरील चर्चेवर संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना जया बच्चन यांनी हे उत्तर दिलं आहे. “सध्या सर्वात जास्त दूषित पाणी कुठे आहे? ते कुंभमेळ्यात आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आहेत ज्यामुळे पाणी दूषित झाले आहे. खऱ्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही,” महाकुंभाला भेट देणाऱ्या सामान्य किंवा गरीब लोकांना पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही, तर व्हीआयपींना विशेष वागणूक मिळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले सोनू निगम? 

खासदार जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये सोनू निगम म्हणाले, “जया बच्चन यांनी आपले मानसिक संतुलन गमावले आहे. अमिताभजी त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा.”

जया बच्चन जी ने अपना मानसिक संतुलन खो दिया है।

अमिताभ जी, इन्हें किसी अच्छे डॉक्टर से दिखाइए।

pic.twitter.com/Dro6Jxvhq7

— Sonu Nigam (@SonuNigamSingh) February 3, 2025

कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी

महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा: कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी; अनेकांचा मृत्यू, जखमींची संख्याही जास्तच; पंतप्रधानांचा योगी आदित्यनाथ यांना फोन

भाविकांनी गर्दी करणे टाळावे; प्रशासनाचे आवाहन

महाकुंभात होणारी भाविकांची मोठी गर्दी पाहता मेळाव्याच्या अधिकाऱ्याने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. मेळा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आखाड्यांशी चर्चा सुरू आहे. अमृतस्नानाची वेळ काही काळानंतर निश्चित होऊ शकते. आखाड्यांनी स्नान करावे अशी आमची इच्छा आहे, पदाधिकारी त्यांची व्यवस्था करत आहेत. आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. सर्व बॅरल ब्रिज आणि बॅरिकेड्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगम नाक्यावर गर्दी जमू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title: Famous singer sonu nigam criticizes to mp jaya bachchan about mahakumbh 2025 stampede dead people statement prayagraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Mahakumbh Mela
  • singer sonu nigam

संबंधित बातम्या

Sonu Nigam Birthday: वयाच्या चौथ्यावर्षी रफी साहेबांचे गाणे गाऊन सुरु केला प्रवास, अभिनयातही चमकवले करिअर
1

Sonu Nigam Birthday: वयाच्या चौथ्यावर्षी रफी साहेबांचे गाणे गाऊन सुरु केला प्रवास, अभिनयातही चमकवले करिअर

कन्नड वादावरून सोनू निगमच्या अडचणीत वाढ; पोलीस पोहचले गायकच्या घरी, बंगळुरू पोलिसांकडे नोंदवणार जबाब!
2

कन्नड वादावरून सोनू निगमच्या अडचणीत वाढ; पोलीस पोहचले गायकच्या घरी, बंगळुरू पोलिसांकडे नोंदवणार जबाब!

‘किंमत मोजावी लागेल…’, कन्नड चित्रपट निर्माते सोनू निगमवर संतापले, घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
3

‘किंमत मोजावी लागेल…’, कन्नड चित्रपट निर्माते सोनू निगमवर संतापले, घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

‘भाषा आणि धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणाऱ्या…’, कन्नड वादानंतर आता गायक सोनू निगमची प्रतिक्रिया समोर!
4

‘भाषा आणि धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणाऱ्या…’, कन्नड वादानंतर आता गायक सोनू निगमची प्रतिक्रिया समोर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.