दिल्लीतील टिकरी सीमेवर रविवारी पुन्हा एकदा शेतकरी आणि दिल्ली पोलीस आमनेसामने आले. जंतरमंतरवर सुरु असलेल्या महिला कुस्तीपटूंना आंदोलनाला (wrestlers protest) पाठिंबा देण्यासाठी हे शेतकरी जंतरमंतरवर यायला निघाले मात्र, दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर रोखले. मात्र, या महिला शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांचे न जुमानता समोर जाण्याचा प्रयत्न केला. महिला शेतकऱ्यांनी टोल प्लाझावर जाऊन आंदोलन सुरू केले. रस्ता अडवला. त्यामुळे वाढता आक्रोश पाहता दिल्ली पोलिसांची नमतं घेत त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली.
[read_also content=”घटस्फोटाचं सेलिब्रेशन बेतलं जीवावर! आंनदाच्या भरात बंजी जंपिंग कारयला गेला, 70 फूट उंचीवर तुटला दोर, अन्… https://www.navarashtra.com/world/rope-broke-after-man-goes-for-bungee-jumping-to-celebrate-divorce-in-brazil-nrps-395895.html”]
या महिला कुस्तीपटुंना समर्थन देण्यासाठी सुमारे 10 बसेसमधून महिला शेतकरी पंजाबच्या विविध भागातून दिल्लीतील जंतरमंतरपर्यंत आल्या आहेत. त्यांनी स्वयंपाकाचे साहित्यही आणले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना सरकारने तातडीने अटक करावी, असे महिला शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महिला कुस्तीपटू सतत निषेध करत आहेत आणि त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे मंचावरून सांगत आहेत. अशा परिस्थितीत आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी. थांबवले तर तिथेच थांबू, असे महिलांनी सांगितले.
जंतरमंतर वर सुरू असलेल्या आंदोनलनााल पंजाबमधुनही समर्थन मिळत आहे. पंजाबच्या भारतीय किसान युनियनच्या (एकता उग्रहण) शेकडो महिला काल पंजाबहून दिल्लीला रवाना झाल्या होत्या. महिलांचा पहिला थांबा जिंदमध्ये होता आणि आजचा थांबा जंतरमंतरवर असणार आहे. तर, भारतीय किसान युनियन एकता उग्रांहाचे प्रमुख जोगेंद्र सिंह उग्रांह हेही महिलांसोबत जंतरमंतरवर गेले आहेत. या प्रकरणी चौकशीची गरज नाही. मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगत असताना त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ब्रिजभूषण शरण सिंह यांना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी. सरकारने ब्रिजभूषण शरण यांना लवकर अटक न केल्यास मोठे आंदोलन छेडणार आहे. एवढेच नाही तर युनायटेड किसान मोर्चाने 11 मे ते 18 मे या कालावधीत देशभरातील महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ निदर्शने करण्याची घोषणाही जोगिंदर उगराहन यांनी केली.