Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Five reasons for BJP’s victory: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विक्रमी विजय; ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

भाजपने निवडणुकीपूर्वी दिल्लीतील महिलांसाठी दरमहा ₹2500 देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडरवर ₹500 सबसिडी आणि सणासुदीच्या काळात एक मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2025 | 01:53 PM
Five reasons for BJP’s victory: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विक्रमी विजय; ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपने 48 जागांवर आघाडी घेतली. त्याचवेळी गेल्या 11 वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा (AAP) मात्र दारूण पराभव झाला. पण अरविंद केजरीवालांचा पराभव हा आपसाठी सर्वात मोठा धक्का होता. मोदी लाट असतानाही अरविंद केजरीवाल यांच्या धोरणांमुळे  दिल्लीकरांनी २ टर्म केजरीवालांच्या आपला बहूमताने निवडून दिले. पणयावेळी मात्र दिल्लीकरांनी आपकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीत केजरीवाल सरकारच्या मोफत योजना अपयशी ठरल्या. त्यामुळे देशभरात  आपच्या पराभावची चर्चा  सुरू आहे. यानंतर केजरीवाल यांच्या पराभवाची कारणेही समोर आली  आहेत..

1) ‘शीशमहल’ प्रकरण ठरले महत्त्वाचे मुद्दा

भाजपने दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी करोडो रुपये खर्च करून आपल्या ‘आम आदमी’च्या प्रतिमेला छेद दिला असल्याचा आरोप भाजपने सातत्याने केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपने ‘शीशमहल’ प्रकरण हत्यार बनवले आणि मोठ्या प्रमाणावर या मुद्द्यावरून केजरीवाल यांना लक्ष्य केले. यामुळे दिल्लीच्या जनतेमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली.

Jalna News: राज्य सरकारची मोठी कारवाई; मनोज जरांगेंचा मेव्हणा तडीपार

2) यमुना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा

यमुना नदीतील वाढते प्रदूषण आणि दूषित पाण्याचा प्रश्न देखील या निवडणुकीत मोठा मुद्दा ठरला. भाजपने आरोप केला की, आम आदमी पक्षाच्या सत्तेत यमुना नदीची स्थिती अधिकच वाईट झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी टॅपमधील पाणी प्यायल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता, मात्र भाजपने याला प्रतिउत्तर देत दिल्लीत ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठ्याचे उदाहरण दिले. हा मुद्दा भाजपच्या प्रचाराचा मुख्य भाग बनला आणि मतदारांनी याकडे गांभीर्याने पाहिले.

3) महिलांसाठी 2500 रुपयांची योजना आणि सबसिडी

भाजपने निवडणुकीपूर्वी दिल्लीतील महिलांसाठी दरमहा ₹2500 देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडरवर ₹500 सबसिडी आणि सणासुदीच्या काळात एक मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या सभांमध्ये हे आश्वासन दिले आणि भाजप सत्तेत आल्यावर त्वरित अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. महिलांसाठीच्या या योजनेने भाजपला मोठा जनाधार मिळवून दिला.

लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

4) आक्रमक प्रचार आणि मोठ्या नेत्यांची उपस्थिती

दिल्ली निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांभाळली. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेत आम आदमी पक्षावर थेट हल्ले केले. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात परवेश वर्मा, तर मुख्यमंत्रीपदाची प्रमुख दावेदार आतिशी यांच्याविरोधात रमेश बिधूडी यांना मैदानात उतरवण्यात आले. या लोकप्रिय नेत्यांनी आपच्या नेतृत्वाला मोठ्या अडचणीत आणले आणि भाजपला विजय मिळवून दिला.

5) मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करणे

भाजपने या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. यामुळे दिल्लीत विविध समुदाय, जसे की पूर्वांचली, पंजाबी आणि पहाडी मतदार एकत्र आले. भाजपने हीच रणनीती अन्य राज्यांत यशस्वीपणे राबवली असून, दिल्लीमध्येही त्याचा मोठा फायदा झाला. मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवत एकत्रित मतदान केले आणि पक्षाला विजयाकडे नेले. या पाच प्रमुख मुद्द्यांमुळे दिल्लीच्या जनतेने यंदा भाजपला जोरदार पाठिंबा दिला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, दिल्लीत राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Five main reasons for bjps victory in delhi assembly elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 01:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.