लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
शरीरातील अवयवांपैकी सगळ्यात महत्वाचा असलेला अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करतो. याशिवाय पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी लिव्हर महत्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर किंवा अतिप्रमाणात तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यानंतर लिव्हरचे कार्य बिघडण्यास सुरुवात होते. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर फॅटी लिव्हर, यकृताला सूज येणे, सिरोसिस किंवा कावीळ होण्याची शक्यता असते. शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम लिव्हर करते. मात्र लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य – iStock)
असंतुलित आहार, जंक फूडचे अतिसेवन, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरत इत्यादी गोष्टींमुळे लिव्हरवर ताण येतो, ज्यामुळे लिव्हरचे कार्य पूर्णपणे बिघडून जाते. आज आम्ही तुम्हाला लिव्हरचेकार्य सुरळीत ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल आणि फॅटी लिव्हरसह इतर कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.
लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
दैनंदिन आहारात लिंबूवर्गीय आणि विटामिन सी युक्त फळांचे सेवन नियमित करावे. यामुळे शरीरातील विटामिन सी ची कमतरता दूर होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. विटामिन सी युक्त फळांचे सेवन केल्यामुळे लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जातात, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते. यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून नियमित सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर हा उपाय नियमित केल्यास काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल. लिंबू पाणी लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि लिव्हर डिटॉक्स होईल. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे लिव्हरच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. तसेच हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर बीट गाजराचा रस प्यावा. यासाठी मिक्सरच्या भांड्यात बीट, गाजरचे तुकडे घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून रस तयार करून घ्यावा. बीट गाजरच्या रसाचे नियमित सेवन केल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होईल. यामध्ये फ्लेव्होनॉईड्स आणि बीटालेन नावाचे अँटीऑक्सिडंट्स आढळून येते, ज्यामुळे लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे.
रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ होण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचे सेवन
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. दैनंदिन आहारात सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय लिव्हरचे कार्य सुधारेल. फॅटी लिव्हर किंवा लिव्हरला आलेली सूज कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.