• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Jalna »
  • Deportation Action Against Manoj Jaranges Brother In Law Vilas Khedkar Nras

Jalna News: राज्य सरकारची मोठी कारवाई; मनोज जरांगेंचा मेव्हणा तडीपार

जालना प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. जालना जिल्ह्यासह बीड, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यांतून ९ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2025 | 11:51 AM
Jalna News: राज्य सरकारची मोठी कारवाई; मनोज जरांगेंचा मेव्हणा तडीपार

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जालना:  राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटीलही चांगलेच आक्रमक झाले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कमी लेखण्याची चूक करू नये,” असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे. हे सर्व सुरू असतानाच राज्य सरकारनेही आता जालन्यात मोठी कारवाई सुरू केली आहे.  मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावर जालना प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, समाजासाठी झटणारे जरांगे पाटील आणि दुसरीकडे वाळू चोरीच्या प्रकरणात त्यांचा मेहुणा अडकल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

जालना प्रशासनाची मोठी कारवाई

मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह ९ वाळू माफियांना तडीपार करण्यात आले आहे. रात्री उशिरा अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. तडीपार झालेल्या व्यक्तींवर अवैध वाळू उत्खनन, चोरी, जाळपोळ, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, तसेच सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे प्रशासनाने वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे.

Delhi Assembly Elections 2025 : “दिल्ली की जीत हमारी, अब बंगाल की बारी”; भाजप नेत्याचे थेट ममता बॅनर्जींना आव्हान

आंदोलनात सहभागी असलेले आरोपी

विशेष म्हणजे, तडीपार करण्यात आलेल्या ९ आरोपींपैकी ६ जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. १ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर, बस जाळल्याच्या प्रकरणात विलास खेडकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

वाळू माफियांवर कठोर कारवाई

जालना प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. जालना जिल्ह्यासह बीड, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यांतून ९ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींवर गुन्हे दाखल असल्याने प्रशासनाने कठोर निर्णय घेतला. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे.

Amravati News : मोर्शीत धडा वेगळे शीर असलेला आढळला मृतदेह; नागरिकांमध्ये एक

तडीपार करण्यात आलेले आरोपी

जालना जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, एकूण ९ जणांना तडीपार करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या कठोर निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 1) गजानन गणपत सोळुंके,2) केशव माधव वायभट, 3) संयोग मधुकर सोळुंके, 4) विलास हरिभाऊ खेडकर, 5) अमोल केशव पंडित, 6) गोरख बबनराव कुरणकर, 7) संदीप सुखदेव लोहकरे, 8) रामदास मसूरराव तौर 9) वामन मसुरराव तौर .

SIAC मुंबईतर्फे यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभिरूप मुलाखतीचे आयोजन

विलास   खेडकर यांच्यावर कठोर कारवाई

विलास खेडकर यांना जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून, त्यात प्रामुख्याने वाळू चोरी आणि सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.

त्यांच्यावर दाखल गुन्हे:

  • 2021: ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
  • 2023: शहागड येथे बस जाळल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (खूनाचा प्रयत्न), 353 (सरकारी कामात अडथळा) आणि 435 (जाळपोळ) अंतर्गत गुन्हा नोंद.
  • 2023: गोदावरी नदीतून 100 ब्रास आणि 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल.

तडीपारीचा निर्णय

या सर्व गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, विलास खेडकर यांना जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनाने वाळू माफियांवर वचक बसवण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Deportation action against manoj jaranges brother in law vilas khedkar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Manoj Jarange

संबंधित बातम्या

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला
1

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला

“त्यांना रोजगार हमीचं काम…; धनंजय मुंडेंनी कामाची मागणी करताच जरांगे पाटलांचे टीकास्त्र
2

“त्यांना रोजगार हमीचं काम…; धनंजय मुंडेंनी कामाची मागणी करताच जरांगे पाटलांचे टीकास्त्र

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार
3

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार

आरक्षणामुळे मराठा-ओबीसीमध्ये लग्न होणार का? लक्ष्मण हाके अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली!
4

आरक्षणामुळे मराठा-ओबीसीमध्ये लग्न होणार का? लक्ष्मण हाके अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.