नवी दिल्ली: झारखंडच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला आणण्यात आले आहे. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील त्यांच्यासोबत दिल्लीला आले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला रेफर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासू शिबू सोरेन सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. पण आज अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्यात आले. राज्यसभा खासदार दिशाम म्हणाले की, डॉक्टर शिबू सोरेन यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. काही वर्षांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शिबू सोरेन यांना रांचीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भर कॉन्सर्टमध्येच सोनू निगम चाहत्यांवर भडकला; म्हणाला, ‘उभंच राहायचं असेल तर निवडणुकीत
शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते, परंतु चिरुडीह हत्याकांडात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. शिबू सोरेन यांचे वडील शोभ्रम सोरेन यांची हत्या झाली तेव्हा त्यांनी राजकारणाच्या जगात प्रवेश केला होता.
शिबू सोरेन यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली पण या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. तथापि, १९८० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक क्षेत्रात नशीब आजमावले आणि निवडणूक जिंकली. यानंतर शिबू सोरेन यांनी १९८६, १९८९, १९९१, १९९६ मध्ये सतत निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला.
महिनोन् महिने आतड्यात सडलेला शौच येईल त्वरीत बाहेर, 5 भाज्यांचा करा समावेश बद्धकोष्ठ
२००४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी दुमका येथून लढवली आणि ती निवडणूक जिंकून लोकसभेत पोहोचले. यासोबतच त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. सध्या त्यांचा मुलगा हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. लोक शिबू सोरेन यांना ‘गुरुजी’ या टोपणनावानेही ओळखतात. ते तीनदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आठ वेळा निवडणूक जिंकली. यासोबतच ते दोनदा राज्यसभेचे खासदारही झाले.