Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आग्राच्या ताजमहालमध्ये ओतले गंगाजल; दोन तरुणांना अटक

ताजमहाल हा जगभरातील आठ आश्चर्यामधील एक आहे.सध्या ताजमहाल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ताजपमहालच्या आतमध्ये एका व्यक्तीने गंगेचे पाणी ओतल्याची घटना घडली आहे. हिंदू महासभेच्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 03, 2024 | 05:05 PM
ताजमहलमध्ये गंगाजल ओतले

ताजमहलमध्ये गंगाजल ओतले

Follow Us
Close
Follow Us:

आग्रा : ताजमहाल हा जगभरातील आठ आश्चर्यामधील एक आहे. भारताच्या सुंदर अशा स्थापत्यशैलीचा एक नमुना असलेला ताज महाल पाहण्यासाठी परदेशातून लोकं येत असतात. सध्या ताजमहाल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ताजपमहालच्या आतमध्ये एका व्यक्तीने गंगेचे पाणी ओतल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून असे वर्तन ही करणारी व्यक्ती हिंदू महासभेचा कार्यकर्ता देखील आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा हे मुमताज हिचे कबरस्थान आहे. नक्षीदार सुबक कामासाठी ताजमहाल प्रसिद्ध आहे. मात्र ताजमहालमधील कबरीवर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने गुपचुपपणे गंगाजल अर्पण केले. समाधीवर पवित्र गंगाजल अर्पण केल्याच्या आरोपावरून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी विनेश आणि श्याम या दोघांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे हिंदू महासभेचे कार्यकर्ते आहेत.

इन बेवकुफो को कोई समझाओ कीं सावन में गंगा जल शिवलिंग पर चढ़ाया जाता है ना कीं कब्र पर आगरा :ताजमहल के अंदर कब्र पर अखिल भारत हिन्दू महासभा के कार्यकर्ताओं ने गंगाजल चढ़ाया।#tajmahal pic.twitter.com/6s0vDrc0CO — Gaurav Yadav (@ygauravyadav) August 3, 2024

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक माणूस गुप्तपणे बिस्लेरीच्या बाटलीतून कबरीवर पाणी ओतत आहे. याठिकाणी एक सुरक्षा कर्मचारी देखील असल्याचे दिसत आहे. मात्र या सुरक्षारक्षकाने तरुणाला असे करण्यापासून रोखलेले नाही. तसेच त्या तरुणाला इतर कोणीही देखील पाणी टाकण्यापासून अडवले नाही.

त्याचप्रमाणे अखिल भारतीय हिंदू महासभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीरा राठोड या देखील गंगाजलाचा कलश घेऊन आल्या होत्या. त्यांनी ताजमहलाजवळ जाऊन भगवान शिव तिच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तसे करण्याची आज्ञा दिली असल्याचा दावा केला. त्यांना ताजमहाल येथे गंगाजल अर्पण करायचे होते,  मात्र पोलिसांनी त्यांना पश्चिमेकडील गेटवर अडवले. खूप तास सुरक्षा चौकात गोंधळ सुरू होता. ताज महाल हा तेजो महालय असून ते एक भगवान शिवाचे मंदिर आहे आणि त्या शिवलिंगावर गंगाजल अर्पण करण्यासाठी आल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Web Title: Ganga water poured into the taj mahal at agra two people arrested of hindu mahasabha nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 05:05 PM

Topics:  

  • Agra
  • Taj Mahal

संबंधित बातम्या

ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी
1

ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.