Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Nightclub Fire: 25 लोकांच्या मृत्यूला जबाबदार नाईट क्लबचा मालक भारत सोडून फरार, ‘या’ देशात आश्रय

शनिवारी रात्री उशिरा पणजीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २० नाईट क्लब कर्मचारी आणि पाच पर्यटकांचा समावेश आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 08, 2025 | 10:59 PM
गोव्यातील नाईटक्लब प्रकरणात मालक फरार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

गोव्यातील नाईटक्लब प्रकरणात मालक फरार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • गोवा नाईट क्लबमधील आगीचा हाहाःकार 
  • २५ लोकांचा झाला मृत्यू
  • मालक भारतातून फरार, थायलंडमध्ये आश्रय 
गोव्यात एका नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे. क्लबच्या महाव्यवस्थापकासह चार कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी नाईटक्लब मालकांची, लुथ्रा बंधूंचीही आरोपी म्हणून नावे दिली आहेत, परंतु ते देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

गोवा पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली त्याच दिवशी क्लब मालक गौरव लुथ्रा आणि सौरभ लुथ्रा मुंबईहून थायलंडला पळून गेले. ते इंडिगोच्या फ्लाइट 6E 1073 मध्ये चढले आणि फुकेतला गेले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “सौरभ आणि गौरव लुथ्राला लवकरात लवकर अटक करण्यासाठी गोवा पोलिसांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या इंटरपोल विभागाशी समन्वय साधण्यासाठी पावले उचलली आहेत.”

नाईटक्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू

पणजीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मृतांमध्ये २० नाईटक्लब कर्मचाऱ्यांचा आणि 5 उपस्थित असलेल्या पर्यटकांचा समावेश आहे, त्यापैकी चार मृत हे दिल्लीचे होते. पाच जखमींवर सरकारी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMCH) मध्ये उपचार सुरू आहेत.

७ डिसेंबर रोजी लुकआउट सर्क्युलर जारी

आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर, गोवा पोलिसांच्या विनंतीवरून इंटेलिजेंस ब्युरो (BOI) ने त्यांच्याविरुद्ध ७ डिसेंबरपर्यंत लूकआउट सर्क्युलर जारी केले. अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईस्थित इमिग्रेशन ब्युरोशी संपर्क साधण्यात आला आणि असे आढळून आले की दोन्ही आरोपी ७ डिसेंबर रोजी सकाळी ५:३० वाजता फुकेतला जाणाऱ्या फ्लाईट ६E १०७३ मध्ये चढले होते, ही आगीची घटना घडल्यानंतर लगेचच, या दोघांनी फुकेतला जायचा मार्ग निवडला आणि कोणालाही न सांगता निघून गेल्याने आता त्यांच्यावर फरार हा ठप्पाही बसला आहे. 

दिल्लीतील घरावर चिठ्ठी चिकटवली

STORY | Goa nightclub fire: Owners Saurabh and Gaurav Luthra fled to Thailand after tragedy, say police Saurabh and Gaurav Luthra, the owners of the Goa nightclub wanted in connection with the fire tragedy that claimed 25 lives at the facility, have fled to Thailand, prompting… pic.twitter.com/wcQBdVI8ip — Press Trust of India (@PTI_News) December 8, 2025

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत

गोवा पोलिसांनी आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी तातडीने दिल्लीला एक पथक पाठवले होते. “ते उपलब्ध नसल्याने, कायद्याच्या योग्य कलमांखाली त्यांच्या घराच्या गेटवर नोटीस चिकटवण्यात आली. यावरून पोलिसांनी ‘तपास टाळण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो,” असे सांगितले आहे. 

गोवा पोलिसांनी क्लबचा कर्मचारी भरत कोहली याचा ट्रान्झिट रिमांड घेतला आहे आणि त्याला गोव्यात आणत आहेत. त्यांनी सांगितले की, सर्व २५ मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे आणि मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. दरम्यान ही घटना झाल्याच्या पूर्वीचा एक व्हिडिओदेखील सध्या व्हायरल होत आहे. एक महिला नृत्य करताना अचानक छताच्या काचा फुटून ही घटना घडली असल्याचे दिसून येत आहे. 

(बातमी स्रोत – PTI)

Goa Fire : गोवा नाईटक्लब आग प्रकरणी क्लब मॅनेजरला अटक, मालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी

Web Title: Goa nightclub fire tragedy owner luthra brothers left india took refuge in thailand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 10:59 PM

Topics:  

  • Goa News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.