Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Om Prakash Chautala : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन; ५ वेळा भूषवलंय मुख्यमंत्रिपद

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलचे (INLD) प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचं शुक्रवारी दुपारी त्यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 20, 2024 | 04:22 PM
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन; ५ वेळा भूषवलंय मुख्यमंत्रिपद

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन; ५ वेळा भूषवलंय मुख्यमंत्रिपद

Follow Us
Close
Follow Us:

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलचे (INLD) प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचं शुक्रवारी दुपारी त्यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.चौटाला पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे पुत्र होते. त्यांच्यावर शनिवारी दुपारी सिरसा जिल्ह्यातील तेजा खेरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.चौटाला यांच्या पश्चात दोन मुले अजय सिंह चौटाला आणि अभय सिंह चौटाला आणि तीन मुली असा परिवार आहे.

Winter Session : यांना उचलून बाहेर फेका! विधानसभा अध्यक्षांनी आमदाराला काढलं बाहेर, Video एकदा पाहाच

अभय हे यापूर्वी हरियाणा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यांचा मुलगा अर्जुन चौटाला हे सध्या हरियाणातील रानिया मतदारसंघातून आमदार आहेत. अजय चौटाला यांचा मुलगा दुष्यंत चौटाला हे मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप-जेजेपी आघाडी सरकारच्या काळात हरियाणाचे उपमुख्यमंत्री होते.आयएनएलडीचे प्रवक्ते राकेश सिहाग यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितलं की, ओम प्रकाश चौटाला यांची प्रकृती सकाळी बरी होती. मात्र, काही तासांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

चौटाला यांना 2013 मध्ये भरती प्रकरणात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ५५ ​​जणांमध्ये त्यांचा मोठा मुलगा अजय चौटाला यांचाही समावेश आहे.या शिक्षेचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा फटका बसला आणि ते पुन्हा निवडणूक लढवू शकले नाहीत.चौटाला यांची जुलै २०२१ मध्ये तिहार तुरुंगातून सुटका झाली होती.

Mumbai Boat Accident Video : ‘नीलकमल’ला नेव्हीच्या बोटीची धडक कशी बसली; थरारक Video आला समोर, एकदा बघाच नक्की काय घडलं

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंध तोडून देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याचं काम हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी 2021 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली.सप्टेंबर २०२२ मध्ये फतेहाबादमध्ये चौटाला यांच्या रॅलीत नितीश कुमार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल, राजद नेते आणि बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत सहभागी झाले होते.

ओमप्रकाश चौटाला त्यांच्या मालमत्तेवरूनही वादात सापडले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत, त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 2006 मध्ये सीबीआयने चौटाला कुटुंबाची एकूण संपत्ती 1467 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं.सध्या चौटाला कुटुंबातील अभय चौटाला, अजय चौटाला, रणजीत चौटाला, दुष्यंत चौटाला, नयना चौटाला, सुनैना चौटाला, आदित्य देवी लाल आणि अर्जुन चौटाला राजकारणात सक्रिय आहेत.

Web Title: Haryana former cm and inld leader om prakash chautala passed away at 89

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • Haryana News

संबंधित बातम्या

मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी
1

मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी

Crime News : २० कोटींचं कर्ज, ५ वर्षे अंडरग्राउंड…; मित्तल कुटुंबातील ७ जणांच्या आत्महत्येचं असं उलगडलं गुढ
2

Crime News : २० कोटींचं कर्ज, ५ वर्षे अंडरग्राउंड…; मित्तल कुटुंबातील ७ जणांच्या आत्महत्येचं असं उलगडलं गुढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.