'नीलकमल'ला नेव्हीच्या बोटीची धडक कशी बसली; थरारक Video आला समोर, एकदा बघाच नक्की काय घडलं
अलिबागमधील नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या धडकेत ८० जण बुडले आहेत. बोटीच्या धडकेचा व्हिडिओ हाती आला आहे. नौदलाची स्पीड बोट समुद्रात घिरट्या घालत आहे. दोन फेऱ्या झाल्यानंतर स्पीड बोट वेगाने प्रवासी बोटीच्या दिशेने अतिशय वेगात आली आणि धकडली. त्यानंतर बोट समुद्रात पलटली. या बोटीत प्रवासी होते. त्यातील ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तरम्यान अपघात घडल्यानंतर नौदलाच्या ११ बोटी, सागरी पोलिसांच्या ३ बोटी आणि तटरक्षक दलाच्या बोटी घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बाप होण्यासाठी जिवंत गिळलं कोंबडीचं पिल्लू; अघोरी कृत्य बेतलं जीवावर
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटीला स्पीड बोटची जोरदार धडक#Mumbai #GatewayOfIndia #MumbaiBoatAccident pic.twitter.com/YHzjnhomtL
— Navarashtra (@navarashtra) December 18, 2024
मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. बोटीत 80 प्रवासी होते त्यातील आतापर्यंत 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक पर्यटक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनारा सोडून सुमारे 50 मीटर आत गेल्यावर अचानक ही दुर्घटना घडली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रायगड आणि मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल, स्थानिक मच्छिमार यांच्या मदतीने प्रवाशांना बचावकार्यात वेग आणण्याबाबत निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्याना दिले आहेत.
दरम्यान या घटनेची शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील पाहणी केली आहे. बचावकार्याला वेग आला आहे. दर्घटना नेमकी कशी घडली याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. नेव्हीच्या बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र नौदलाकडून याचे खंडन करण्यात आल्याचे समजतं आहे. नौदल, तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य केलं जात आहे.