Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत समजून शवागारात ठेवले होते, वडील शोधायला धावले तेव्हा मुलाचा थरथरता हात दिसला अन.. 

घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला असता तो कुठेच सापडला नाही. थोड्या वेळाने सर्वांच्या आशा मावळल्या  पण हिलाराम आपला मुलगा जिवंत असल्याचे सांगत होते.

  • By Aparna
Updated On: Jun 05, 2023 | 03:43 PM
मृत समजून शवागारात ठेवले होते, वडील शोधायला धावले तेव्हा मुलाचा थरथरता हात दिसला अन.. 
Follow Us
Close
Follow Us:
ओडिशा रेल्वे अपघाताबाबत अनेक वेदनादायक कथा समोर आल्या आहेत. कुणाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर कुणाच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले. अनेक निष्पाप मुलं अनाथ झाले. जग बघण्याआधीच आई-वडिलांची सावली डोक्यावरून उठली. तर अपघातात असे ही काही लोक आहेत ज्यांनी गंभीर जखमी होऊन आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकली आहे. या लोकांमध्ये 24 वर्षीय विश्वजित मलिकचाही समावेश आहे, जो वडिलांच्या आग्रहामुळे शवागारात गेल्यानंतरही वाचला.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, विश्वजीतचे वडील  त्याला सोडवायला शालीमार स्टेशनवर आलेले. स्टेशनवर ते त्याच्यासोबत काहीवेळ कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये बसून आले होते. मात्र, तेव्हा आपला मुलगा एवढ्या मोठ्या अपघाताला बळी पडेल आणि त्याला जीवाची बाजी लावावी लागेल याची कल्पनाही त्यांना नव्हती.
अवघ्या काही तासांनंतर जेव्हा विश्वजितचे वडील हिलाराम मलिक यांना रेल्वे अपघाताची बातमी मिळाली.तेव्हा त्यांच्यावर आभाळच कोसळले. हिलारामने मुलाला फोन लावला. सुदैवाने त्याने फोन उचलला. दुखापतीमुळे तो फार काही बोलू  शकला नाही, मात्र विश्वासजीतला गंभीर दुखापत झाल्याचे त्याच्या वडिलांना समजले. यानंतर वडिलांनी ताबडतोब स्थानिक रुग्णवाहिका चालकाला बोलावले आणि मेव्हणा दीपक दाससह बालासोरला रवाना झाले. 230 किलोमीटरचा प्रवास करून  ते बालासोरला पोहोचले.
मुलाचा शोध घेत शवागारात पोहचले
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला असता तो कुठेच सापडला नाही. थोड्या वेळाने सर्वांच्या आशा मावळल्या  पण हिलाराम आपला मुलगा जिवंत असल्याचे सांगत होते. घटनास्थळी मुलाची विचारपूस केल्यानंतर हिलाराम तात्पुरत्या शवागारात पोहोचले, जिथे प्राण गमावलेल्यांचे मृतदेह ठेवण्यात आले होते.
उजवा हात थरथरत होता
हिलाराम याना सुरुवातीला शवागारात आधी आत जाण्याची परवानगी मिळाली नाही, नंतर काही वेळाने कोणाची तरी नजर एका व्यक्तीवर  पडली, ज्याचा उजवा हात थरथरत होता. हिलारामने हात पाहिल्यावर तो विश्वजीतसारखा दिसत होता. यानंतर विश्वजीतला तेथून तातडीने बाहेर काढून बालासोर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
दुखापत गंभीर होती, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला कटक मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. मात्र, बॉण्ड भरल्यानंतर वडील आणि काकांनी विश्वजीतला सोबत घेतले. त्याच्यासोबत एक रुग्णवाहिका होती. त्याच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हात-पाय फ्रॅक्चरसह शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत.

Web Title: He was kept in the mortuary thinking he was dead when the father ran to look for him he saw the sons trembling hand nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2023 | 03:43 PM

Topics:  

  • india
  • Train Accident NEws

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.