Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील 18 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; ताशी 95 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराम या राज्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2026 | 02:33 PM
देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • १८ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा.
  • चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ताशी ९५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
  • समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका.
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने गुरुवारी १८ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ताशी ९५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याची आणि परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत मासेमारीवर बंदी घालण्यात आली असून, समुद्रात असलेल्या मच्छीमारांना परतण्याचे निर्देश दिले आहेत. डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराम या राज्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहू शकतो. राजस्थानच्या जोधपूर, कोटा, बिकानेर, अजमेर, उदयपूर, भीलवाडा, अलवर, भरतपूर आणि सीकर येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

झारखंड खूंटी, सिमडेगा, गुमला, लोहरदगा, बोकारो, सरायकेला-खरसावां तसेच पूर्व आणि पश्चिम सिंहभूम जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाता प्रादेशिक हवामान केंद्राने दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, उत्तर परगणा, हावडा, हुगळी, झारग्राम, दार्जिलिंग, कालिम्पोंग, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

FAQ

१. हवामान विभागाने किती राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे?
भारतीय हवामान विभागाने १८ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

२. वाऱ्याचा वेग किती राहण्याची शक्यता आहे?
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ताशी ९५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

३. मच्छीमारांना काय सूचना देण्यात आली आहे?
समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Heavy rain warning for 18 states in country nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 02:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.