देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात... (File Photo)
नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर २६ राज्यांमध्ये रविवारी काही भागांमध्ये ताशी ९० किमी वेगापर्यंतच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तीन हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे डोंगराळ भागात भूस्खलन आणि अचानक येणाऱ्या पुराचा धोका वाढला आहे.
राजस्थानमध्ये हवामान सध्या कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचावकार्य वाढवण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारसह २६ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. काही भागांमध्ये ताशी ९० किमी वेगापर्यंतचे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Washim News : ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस शनिवारीही सुरूच होता. या काळात, हिमकोटीमध्ये दगड कोसळल्याने वैष्णो देवीच्या यात्रेकरूंसाठी असलेला बॅटरी रोड थोड्या काळासाठी बंद करण्यात आला होता.
उत्तर पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभही सक्रिय
वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या पश्चिम बंगाल-उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील ४८ तासांत ते अधिक मजबूत आणि तीव्र होण्याची शक्यता आहे. याशिवाय, अमृतसरपासून या हवामान प्रणालीपर्यंत मान्सूनचा पट्टा पसरलेला आहे. उत्तर पाकिस्तानवर एक पश्चिमी विक्षोभही सक्रिय आहे. या तीनही हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे पुढील चार दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
नद्या, ओढ्यांना अचानक पूर येण्याचा धोका
मुसळधार पावसामुळे उत्तराखंडच्या सखल भागांमध्ये पाणी साचले असून, नद्या आणि ओढ्यांना अचानक पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने भूस्खलनप्रवण भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. नद्या आणि ओढ्यांजवळ राहणाऱ्या, तसेच सखल भागातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यामुळे रहिवाशांनी हवामानावर लक्ष ठेवावे.
देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा






