याशिवाय, गुजरात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागांतूनही मान्सून परतला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील भागातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात झाली.
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ यामुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. शासनाने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
भूस्खलनामुळे दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मोठी हानी झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांतील जलस्तर वेगाने वाढत आहे, त्यामुळे सखल भागांतील स्थिती गंभीर बनली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिल्लीतही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभर ढगाळ आकाश राहील आणि अधूनमधून सूर्यप्रकाश येईल. राजधानी दिल्लीत गडगडाटी वादळ आणि पाऊस पडू शकतो.
सप्टेंबर महिना उलटून गेला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याचे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला तर ऐन दिवाळीत देखील वरुणराजा हजेरी लावतो की काय? ते…
लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पशुधनाचे नुकसान झाले तर सोयाबीनसारखी पिके पूर्णपणे हातची गेली आहेत.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
Maharashtra Government: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या १ कोटी ४६ लाख हेक्टर क्षेत्रावरील सुमारे ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Weather update: काल अनेक राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला आहे. मात्र आज पुन्हा देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व दौलतराव प्रशालेच्या बाजूला व प्रशालेच्या आतील मैदानावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तसेच शेतातही पाणी साचल्याने शेताला ही तळ्याचे स्वरूप आले आहे.