ढगफुटीत उद्ध्वस्त झालेलं उत्तराखंडमधील धराली गाव नक्की कसं आहे? लोखो पर्यटकांचं का आहे आवडतं स्थान?
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोर्यात वसलेलं आणि गंगोत्री धामला जाणाऱ्या मार्गावर वसलेलं धराली गाव मंगळवारी दुपारी अवघ्या ३० सेकंदांत भयंकर जलप्रलयाचा साक्षीदार बनलं. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गावात मोठं नुकसान झालं आहे. अनेक होमस्टे, हॉटेल्स, घरे मलब्याखाली गाडली गेली आहेत आणि ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
धराली हर्षिल खोऱ्यातील सर्वात समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, तसेच गंगोत्रीला जाणारे हजारो भाविक इथे वर्षभर थांबतात. मात्र आता हे गाव मलब्यात गाडलं गेलं. काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान
गंगोत्री महामार्गावरील महत्त्वाचं स्थान
धराली गाव गंगोत्री धामकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचं ठिकाण आहे. गंगोत्रीपासून अगोदरचं एकमेव मोठी बाजारपेठ म्हणूनही याला ओळख आहे. या भागातले बर्फाच्छादित पर्वत, निसर्गरम्य सेबबागा आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करतात. विशेषतः हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात इथे देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते.
धरालीमध्ये पर्यटकांसाठी अनेक होमस्टे, रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स होते. विशेषतः सफरचंदाच्या बागांमुळे हे गाव “हिवाळ्यातलं स्वर्ग” म्हणून प्रसिद्ध झालं होतं. पण आता ढगफुटीमुळे या सर्व पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानीय लोकांचा रोजगारही धोक्यात आला आहे.
धराली गावाचं केवळ पर्यटनदृष्ट्या नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही मोठं महत्त्व आहे. इथे कैलाशेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. इथे तप केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. ऋषीमुनींच्या तपोभूमीमुळे या भागाला पवित्र स्थानाचं मानलं जातं. गावात सोमेश्वर भगवानाची डोलीही आहे, जी स्थानिक भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.
उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर गावावर कोसळली दरड, २० सेकंदात सर्वकाही उदध्वस्त
दरम्यान या दुर्घटनेत गावातील मुख्य बाजारपेठ, घरं, मंदिर, आणि पर्यटक विश्रामस्थळं सगळं काही मातीखाली गाडलं गेलं आहे. मुखबा गावाकडे जाणारा पारंपरिक पादचारी मार्गही खचला आहे. सध्या NDRF आणि SDRF च्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे, मात्र दुर्गम भागामुळे अडथळे येत आहेत.