मेहबुबा मुफ्तींनी जम्मूतील पूरस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'मंदिरे पिकनिक स्पॉट नाहीत, ती पूजेसाठी आहेत' अशी टीका करत त्यांनी पूरग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजची मागणी केली.
जागतिक बँकेच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की २०४० पर्यंत पुरामुळे बाधित लोकसंख्या सहा पटीने वाढून २.५ कोटींपेक्षा जास्त होईल. अशा परिस्थितीत, या महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज चिंताजनक आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे २५०० रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, जम्मूमधील चेनानी नाल्यात एक कार पडल्याने तीन भाविक वाहून गेले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या मार्गावर भूस्खलन झाल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वैष्णोदेवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. जाणून घ्या या दुर्घटनेची सविस्तर माहिती.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि पिथौरागढ हे जिल्हे सर्वाधिक धोकादायक मानले जातात. अलीकडे घडत असलेल्या काही घटनांमुळे इथलं पर्यटन धोक्यात आलं आहे.
धराली हर्षिल खोऱ्यातील सर्वात समृद्ध पर्यटन स्थळ मानलं जातं. निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, तसेच गंगोत्रीला जाणारे हजारो भाविक इथे वर्षभर थांबतात. मात्र आज झालेल्या ढगफुटीतनंतर झालेल्या दुर्घटनेत हे गाव मलब्यात गाडलं गेलं…
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेत लष्कराचे १० जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. तसंच येथील हेलिपॅड पूर्णपणे मलब्यात गायब झाल असून लष्करी छावणीचंही नुकसान झालं आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील हर्षिल येथे ढगफुटी झाली असून त्यानंतर वाहून आलेल्या मलब्यात अनेक जण गाडले गेले आहेत. तर काही घरं पूर्णपणे उदध्वस्त झाली आहेत. ६० जण बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
लडाखमधील गलवानच्या चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर मोठा दगड कोसळला असून दोन अधिकारी शहीद झाले आहेत, तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना विमानाने उपचारासाठी हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यात आलं आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील खोपोलीनजीक बोरघाटात दरड कोसळली आहे. मुंबई लेनवर दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रसिद्ध केली आहे.
वसई-विरार क्षेत्रात दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असलेली ३३ दरड प्रवण क्षेत्रांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याच्या अनेक घटना वसई-विरार परिसरात घडल्या आहेत.
लाचुंगला जाणारा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून आजपासून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू होईल. बीआरओ टीमने भूस्खलनामुळे साचलेला ढिगारा साफ केला आहे.
स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांतील एका सुंदर गावावर निसर्ग कोपला. बिर्च हिमनदीतील कडा या गावावर कोसळला. लाखो घनमीटर बर्फ, दगड व गाळ एक क्षणात डोंगरावरून खाली आला आणि संपूर्ण ब्लाटेन गाव बघता…
रायगड जिल्ह्यात एक-दोन वर्षांत दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे भूवैज्ञानिकांकडून जिल्ह्यातील अनेक गावांचे काटेकोरपणे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.