नवी दिल्ली – बुधवारी (२३ ऑगस्ट) भारताने एक नवा इतिहास रचला आहे. ISRO नं देशाच्या शिरपेचात मानाता तुरा खोवला. चांद्रयान-3 ची (Chandrayaan-3) मोहीम फत्ते करुन जगाचे लक्ष भारताकडे वेधले आहे. सध्या जगभरातून इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगमध्ये अनेकांचे हात लागले आहेत. अनेकांनी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करुन ही मोहिम फत्ते करण्यासाठी काम केले. चंद्र मोहिमेच्या यशामुळे भारताला चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग करण्यासाठी निवडक राष्ट्रांच्या गटात स्थान मिळाले आहे. हे सर्व अधिक लक्षणीय आहे कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग मिळवणारे भारत हे एकमेव राष्ट्र आहे. यामुळे वैज्ञानिक संशोधन आणि शोधात नवीन मार्ग सापडतील. हे राष्ट्राच्या वाटचालीतील एक मैलाचा दगड आहे. पण सध्या चंद्रावर विक्रम लँडर आणि रोव्हरचे कसे सुरु आहे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. (How is the work of Vikram lander and rover on the moon? Modi will go to Bangalore on August 26; Where did the children’s names ‘Chandrayaan’)
विक्रम लँडर ल रोव्हरचे काम व्यवस्थित सुरु…
दरम्यान, INSPACE चे अध्यक्ष पवन के गोयंका यांनी बुधवारी रात्री उशिरा प्रज्ञान रोव्हर रॅम्पमधून बाहेर पडल्याचे चित्र शेअर केले. चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर, 6 चाकी आणि 26 किलो वजनाचे प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरू लागले. गुरुवारी सकाळी, लँडिंगच्या सुमारे 14 तासांनंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रोव्हरच्या बाहेर पडण्याची पुष्टी केली. हा व्हिडिओ चांद्रयान-3 ने पाठवला आहे. त्यात चंद्राचे सुंदर दृश्य दिसते. 2 मिनिटे 17 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला चंद्राच्या पृष्ठभागावर लहरीसारखे दृश्य दिसत होते. जवळ पोहोचताच तेथील खड्डे दिसले.
रोव्हर प्रज्ञानच्या सर्व क्रिया वेळेवर
गुरुवारी संध्याकाळी चांद्रयान उतरण्यापूर्वी इस्रोने हा व्हिडिओ जारी केला. इस्रोने सांगितले की, रोव्हरने हालचाल सुरू केली आहे. रोव्हर प्रज्ञानच्या सर्व क्रिया वेळेवर होत आहेत. संपूर्ण यंत्रणा सामान्य आहे. लँडर मॉड्यूल पेलोड्स ILSA, RAMBHA आणि ChaSTE कार्यान्वित झाले आहेत.
26 ऑगस्टला मोदी बंगळुरात…
दरम्यान, चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 26 ऑगस्ट रोजी बंगळुरूमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतील. याच इस्रोच्या वैज्ञानिकांचे ते भेटून अभिनंदन करणार आहेत. तसेच त्यांच्या या कार्याबद्दल जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल टीम इस्रो आणि वैज्ञानिक समुदायाचे हार्दिक अभिनंदन असं त्यांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. संपूर्ण देशासाठी हा क्षण अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे.
ओडिशात ४ बालकांची नावे ‘चांद्रयान’
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल सध्या देशात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीपूर्वीच देशात दिवाळी साजरी केला जात आहे. दरम्यान, ओडिशा राज्यात चार नवजात बालकाची नावे चांद्रयान ठेवली आहेत. ओडिशातील केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयात चार मुलांची नावे चांद्रयान ठेवली आहे. तीन मुले व एका मुलीचे नाव चांद्रयान ठेवले आहे.