Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-100 च्या वाहनांना इंधन पुरवठा कसा करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले होते की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांच्या पुढे वाढवण्याची कोणतीही त्वरित योजना नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2026 | 08:27 AM
E-100 च्या वाहनांना इंधन पुरवठा कसा करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

E-100 च्या वाहनांना इंधन पुरवठा कसा करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारने 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्सी वाहनांचे धोरण आणले आहे.
  • या वाहनांना E-100 वाहने असे म्हटले जाते.
  • E-100 वाहनांना इंधनाचा पुरवठा कसा सुनिश्चित करणार, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.

नवी दिल्ली : तुम्ही 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्सी वाहनांचे धोरण आणले. मात्र, या E-100 वरील वाहनांना इंधन पुरवठा कसा सुनिश्चित केला जाईल, हे सांगा, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला. यावर अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामानी म्हणाले, यासाठी उत्पादन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागतील. सरकार त्यावर न्यायालयाला माहिती देईल, असे त्यांनी सांगितले. नंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची गरजही व्यक्त केली. न्यायमूर्ती सुंदरेश म्हणाले की, या समस्येकडे व्यापक जनहित आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येचे, विशेषतः खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हितही लक्षात घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती सुंदरेश म्हणाले, “देशातील मोठ्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मला सर्वात महत्त्वाचा वाटणारा तिसरा पैलू म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना सक्षम कसे बनवायचे या पैलूवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावर कोणीही बोलत नाही.”

यावर अॅटर्नी जनरल म्हणाले की, या खटल्यातील युक्तिवादादरम्यान ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही बोलतील. मात्र, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये २६ ऑक्टोबर रोजी सुधारणा अधिसूचित केल्या होत्या.

शुद्ध इथेनॉलवर चालणारी वाहने देखील नियमांमध्ये समाविष्ट

या अंतर्गत ई-१०० म्हणजेच जवळपास शुद्ध इथेनॉलवर चालणारी वाहने देखील नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. पूर्वी ई-८५ सारख्या उच्च्च इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी तरतूद होती. मात्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले होते की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांच्या पुढे वाढवण्याची कोणतीही त्वरित योजना नाही.

FAQ

प्र.1. E-100 वाहन म्हणजे काय?

उ. 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या वाहनांना E-100 वाहने म्हणतात.

प्र.2. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणता सवाल विचारला?

उ. E-100 वाहनांना इंधनाचा पुरवठा कसा सुनिश्चित केला जाणार, असा सवाल न्यायालयाने विचारला.

प्र.3. E-100 वाहनांमध्ये कोणते इंधन वापरले जाते?

उ. या वाहनांमध्ये 100 टक्के इथेनॉल इंधन वापरले जाते.

Web Title: How will fuel be supplied to e 100 vehicles supreme court asks the central government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 08:27 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.