Hyderabad Hindu Banjara Hills temple Bulldozer action BJP Madhavi Lata arrested
Hyderabad Hindu temple Bulldozer action : हैदराबाद : तेलंगणामध्ये एका हिंदू मंदिरावरील कारवाईवरुन वाद पेटला आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील 100 वर्षे जुन्या मंदिरावर बुलडोजरच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसरामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. बंजारा हिल्स परिसरातील प्रशासनाने 100 वर्षांच्या ग्राम देवता मंदिर पाडण्याचा आदेश दिला आहे. मंदिरावरील या कारवाईला जोरदार विरोध आणि निषेध करण्यात येत आहे.या कारवाईला भाजपाच्या नेत्या माधवी लता यांनी तीव्र विरोध करत जोरदार हल्लाबोल केला आहे. माधवी लता यांना कायदा व सुव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरातील ग्रामदेवतेचे मंदिर पाडले जाणार असल्याची माहिती मिळाताच मंदिर परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या मंदिरावरील बुलडोझर कारवाईविरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे. निदर्शने करण्यासाठी स्थानिक लोक आणि भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन करताना भाजपचे नेत्या माधवी लता यांनीही सहभाग घेतला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला. मात्र आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर माधवी लता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या निषेधाच्या वेळी भाजप नेत्या माधवी लता म्हणाल्या की, ‘राज्य सरकारने मंदिर तोडून कोटी हिंदूंच्या भावना फेटाळून लावल्या आहेत. मी शांततेत निषेध करत होते, पण पोलिसांनी मला ताब्यात घेतले. तेलंगणात हिंदू सुरक्षित नाहीत, सरकार हिंदूंवर छळ करत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माधवी लता या हातातील जपमाळेने जप करत राहिल्या होत्या. मंदिर पुन्हा बांधण्याची मागणी आक्रमक कार्यकर्त्यांनी केली आणि या कारवाईसाठी जबाबदार असलेल्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
#WATCH | Hyderabad, Telangana | BJP leader Madhavi Latha says, “The state government demolished a temple and hurt the sentiments of the people. They are not allowing me to protest silently…The temple was built on government land…They demolished the temple late last night…” https://t.co/OyBY1zuXWN pic.twitter.com/z5SWFh0oQL
— ANI (@ANI) July 24, 2025
हिंदू धार्मिक स्थळांवरील हल्ला
भाजपा आणि हिंदू संघटनांनी कॉंग्रेसच्या रेवॅन्थ रेड्डी सरकारवर मंदिर तोडल्याचा गंभीरपणे आरोप केला आहे. गुरुवारी, जेव्हा प्रशासनाने रात्रीच्या अंधारात बंजारा हिल्समधील सरकारी भूमीवरील मंदिर पाडले तेव्हा हे प्रकरण गुरुवारी आहे. भाजपाचा असा दावा आहे की मंदिर 100 वर्षांचे होते आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण होते. या घटनेवरून भाजपने रेवंत रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली आहे आणि याला हिंदू धार्मिक स्थळांवरील हल्ला म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२०२४ च्या निवडणुकीत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात माधवी लता उमेदवार होत्या आणि त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या माधवी लता हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित मुद्द्यांवर नेहमीच आवाज उठवतात. आता त्यांनी बंजारा हिल्स परिसरातील ग्रामदैवतेच्या मंदिरावर केलेल्या कारवाईवर जोरदार विरोध केला आहे.