IIT वाल्या बाबांची जुना आखाड्यातून हकालपट्टी; मोठं कारण आलं समोर
संन्यास परंपरेत, गुरु हे पालक आणि देव आहेत. पण IIT बाबा अभय यांनी ही परंपराच मोडली नाही तर त्यांच्या गुरूंचा विश्वासघातही केला आणि अखेर बाबा अभय यांची जुना आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आहे. बाबा अभय यांना सुधारण्याची संधी दिली गेली नाही, असे नाही. त्याला एका शिविरातून काढून दुसऱ्या शिविरात पाठवण्यात आले, तरीही ते वारंवार त्यांचे गुरु आणि जुना आखाड्याचे संत सोमेश्वर पुरी यांचा अपमान करत राहिले.
भारताची आकाश हवाई संरक्षण प्रणाली जगात भारी; आर्मेनियानंतर ‘हा’ मुस्लिम देशही खरेदीदारांच्या रांगेत
जुना अखाड्याचे मुख्य संरक्षक हरी गिरी यांनी बाबा अभय याचं हे कृत्य आखाड्याच्या परंपरेचे उल्लंघन मानले आणि त्यांना बाहेरचा मार्ग दाखवला. बाबा अभय आता जुना आखाड्याच्या कोणत्याही शिविरात राहू शकणार नाहीत किंवा जूना आखाड्याच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे जुना आखाड्यातील गर्दी वाढत होती पण गुरुंचा अपमान केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बाबा अभय नशेत सनातनच्या नावाने चुकीची वक्तव्य करत होते. शिवाय त्यांच्या पालकांबद्दलही चुकीचं बोलत होते.
आयआयटीमधील बाबा अभय यांनी त्यांचे गुरु सोमेश्वर पुरी यांच्यावरही आरोप केला आहे की ते त्यांच्या लोकप्रियतेवर नाराज असल्याने त्यांना आखाड्यातून काढून टाकण्यात आले. काढून टाकल्यानंतरही ते अजूनही कट रचत असल्याचं म्हटलं आहे. आखाड्यातील अनेक संत आणि संन्यासी अभयला नकारात्मक विधाने करू नका, जास्त मादक पदार्थांचं सेवन करू नका आणि आपल्या गुरूंप्रती समर्पित राहा असे समजावून सांगत होते, परंतु त्याने ऐकले नाही.
जम्मू- काश्मीरमध्ये एकाच गावात १६ जणांचा संशयास्पद मृत्यू; गृहमंत्री अमित शहांनी दिले चौकशीचे आदेश
जुना अखाड्याचे संत म्हणाले की, भिक्षूंना त्यांच्या सहकाऱ्यांप्रतीही नम्रतेची भावना असते आणि गुरु आपल्यासाठी देवासारखे असतात. अभयने यांनी ही परंपरा मोडली आहे, म्हणून हरिगिरीजी महाराजांनी त्याला जुना आखाड्यातून बाहेरचा मार्ग दाखवल्याचं म्हटलं आहे.
प्रयागराजमध्ये सोमवारपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संत आणि साधू प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसानी गोरख बाबा उर्फ आयआयटी बाबा, ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते की, आयआयटीमधून अभियांत्रिकी केल्यानंतर ते साधू बनले आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल स्ट्रीममध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण देखील घेतलं. हरियाणाचे रहिवासी असलेल्या आयआयटी साधूचं खरं नाव आहे अभय सिंग. अभय सिंग यांची अभियंता ते संन्यासी बनण्यामागील कहाणीही खूप रंजक आहे. त्यांना फोटोग्राफी करायची होती. फोटोग्राफीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पदवी आवश्यक होती. अशा परिस्थितीत मी एक वर्ष कोचिंग केलं होतं.