जम्मू- काश्मीरमध्ये एकाच गावात १६ जणांचा संशयास्पद मृत्यू; गृहमंत्री अमित शहांनी दिले चौकशीचे आदेश
जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बुधल गावात गेल्या ४५ दिवसांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १२ मुलांचा समावेश आहे. या मृत्यू मागील गूढ अद्याप कायम असून मृत्यूचं कारण शोधण्यात वैद्यकीय तज्ज्ञही अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील एक पथक गठित करून मृत्यूची कारणे शोधण्यासाठी बाधित गावाला भेट देण्याचे आदेश दिले आहेत.
Kolkata Doctor Case: ‘त्या’ अत्याचार प्रकरणात कोर्ट आज निकाल देणार; CBI ने केली मृत्यूदंडाची मागणी
#WATCH | Rajouri, J&K | The Indian Army has been deployed in Budhal village, Rajouri, for security and to provide essentials.
16 deaths have been reported in Budhal village since December 2024 due to a ‘mysterious illness.’ pic.twitter.com/liKX7voiDs
— ANI (@ANI) January 19, 2025
या पथकात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, कृषी मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रालयातील तज्ज्ञांचा समावेश असेल. पशुसंवर्धन, अन्न सुरक्षा आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांमधील तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. ही पथक रविवारी बाधित गावाला भेट देणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने हे पथक भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ मदत पुरवण्यावर तसेच खबरदारी घेण्यावर काम करेल. ज्या तीन कुंटुंबांमधील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तीन कुटुंब एकमेकांपासून काही अतंरावर राहतात. ७ डिसेंबर २०२४ रोजी पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूंची संख्या वाढत आहे.
या दिवशी सुरू होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; किती दिवस चालणार? जाणून घ्या
एका महिन्याभरात १६ गूढ मृत्यूंमुळे लोकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि घबराट दूर करण्यासाठी, आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बुधल गावात पत्रकार परिषद घेतली. गावातील मृत्यू न्यूरोटॉक्सिनमुळे झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं.राजौरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) प्राचार्य डॉ. ए.एस. भाटिया आणि बुधलचे आमदार जावेद इक्बाल चौधरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली.राजौरी येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर लाल राणा; राजौरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शमीम अहमद आणि जीएमसी राजौरी येथील छाती आणि क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. झैम खान हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
डॉ. भाटिया म्हणाले की, सर्व मृतांमध्ये मेंदूला सूज येणे किंवा एडेमा ही एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे. त्यांनी बाधित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या उपचारांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं.
“आम्ही मेंदूचे नुकसान झालेल्या रुग्णांची समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु एकदा रुग्णाच्या मेंदूचं गंभीर मेंदूचं नुकसान झाल तर यामध्ये धोका अधिक असतो,” असं डॉ. भाटिया म्हणाले.
गावातून गोळा केलेल्या नमुन्यांचे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे आणि इतर प्रयोगशाळांमध्ये विश्लेषण करण्यात आले आहे. चाचणी निकालांमध्ये कोणताही विषाणू किंवा बॅक्टेरिया आढळला नाही ज्यामुळे कोणताही संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, चाचण्यांमध्ये असे सिद्ध झाले की विश्लेषण केलेल्या नमुन्यांमध्ये विषारी पदार्थ आढळले.७ डिसेंबर ते १७ जानेवारी दरम्यान बुधल गावात झालेल्या १६ मृत्यूंमागील गूढ उलगडण्यासाठी सरकारने राजौरी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. राजौरी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.