IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर 'या' राज्यांमध्ये...
देशभरात आज अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
अनेक राज्यांमध्ये मोकळे हवामान राहणार
पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
India Weather Update: गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही राज्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असे चित्र दिसून येत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात. परतीचा पाऊस कोणत्या राज्यात धुमाकूळ घालणार ते पाहुयात.
राजधानी दिल्लीत आज नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तर पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर दक्षिण भारतातील कही राज्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान पाहायला मिळत आहे. पूर्वेकडील राज्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
20 आणि 21 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेश राज्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तसेच बिहार, पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील पावसाचा जोर अधून मधून राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, पुणे, विदर्भ व मराठवाडा भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
India Heavy Rain Alert: आज जरा जपूनच! ‘या’ राज्यांवर वरूणराजा कोपणार; IMD चा अलर्ट वाचून म्हणाल…
उत्तर प्रदेशमध्ये आज मान्सून साधारण असण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंड राज्यात पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. उत्तरखंड राज्यात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभगाने आज देखील डेहराडून, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चमोली, पिठोरागाड या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 70 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आज देखील उत्तराखंड राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
India Heavy Rain Alert: आज जरा जपूनच! ‘या’ राज्यांवर वरूणराजा कोपणार; IMD चा अलर्ट वाचून म्हणाल…
हिमाचल प्रदेशमध्ये देखील आज पाऊस कहर करण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या हवामान पावसाळी असण्याचा अंदाज आहे. दरम्यान पर्वतीय राज्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.