rajnath singh
नवी दिल्ली : सध्या देशात एका वेगळ्या कारणावरुन वातावरण तापले आहे. आणि याला जबाबदार आहे केंद्र सरकारने आणलेली नवी अग्निपथ योजना (Agneepath Scheme) देशातील विविध राज्यांनी या योजनेला विरोध केला. भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर (Agneeveer) म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने (Central Government) एक पाऊल मागे घेतलं असून वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तसेच वाढता विरोध लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Home minister depertment) मोठा निर्णय घेतला आहे. ((Major changes in the Agneepath scheme)
[read_also content=”रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, उद्या घराबाहेर पडत असाल तर एकदा ‘खालील वेळापत्रक’ बघूनच घ्या https://www.navarashtra.com/maharashtra/megablock-on-central-and-harbor-railway-line-on-sunday-293900.html https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-boost-your-child-immune-system-during-the-rainy-season-293890.html”]
दरम्यान, नव्या निर्णयानुसार, अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्षाची सूट दिली जाणार आहे. म्हणजे वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तर, अग्निवीरांच्या पहिल्या तुडकीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल असंही गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. (Major changes in the Agneepath scheme for crpf and asam rifle)
नेमकी काय आहे अग्निपथ योजना?
भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) तरुणांना समाविष्ट केलं जाईल. महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील.
योजनेला का होत आहे विरोध?
लष्करात भरती होण्याची इच्छा असणारे हे तरुण यामुळे ना आम्हाला, ना देशाला फायदा होणार असल्याचं सांगत आहेत. तरुणांचा अग्निपथ योजनेतील सर्वात जास्त विरोध असणारी बाब म्हणजे चार वर्षांनी फक्त २५ टक्के तरुणांना संधी मिळणार आहे. आंदोलन करणारे चार वर्षांच्या सेवेनंतर काय? असा प्रश्न विचारत आहेत. एका उमेदवाराने सांगितलं की, जो तरुण वयाच्या १७ व्या व्या वर्षी अग्निवीर होईल त्याच्याकडे कोणतीही व्यावसायिक पदवी किंवा कोणतीही विशेष पात्रता नसते. यामुळे नंतर त्याच्याकडे द्वितीय श्रेणीच्या नोकऱ्या स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. चार वर्षानंतर आम्ही कुठे जायचं? असा या तरुणांचा प्रश्न आहे. त्यामुळं तरुणांचा रोष वाढत असून देशभरात हिंसाचार व आंदोलन होत आहे.