इन्कम टॅक्स ऑफीसमध्ये राडा, सहआयुक्तांकडून उपायुक्तांना खोलीत बंद करून जबर मारहाण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या आयकर कार्यालयात गुरुवारी मोठा राडा झाला. सहआयुक्त योगेंद्र मिश्रा यांनी उपायुक्त म्हणून तैनात असलेले आयआरएस अधिकारी गौरव गर्ग यांच्यावर हल्ला केला. योगेंद्र मिश्रा यांनी गौरव गर्ग यांना कार्यालयातील एका खोलीत बंद करून मारहाण जबर मारहाण केली आहे. यात ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गौरव गर्ग यांनी योगेंद्र मिश्रा यांच्याविरुद्ध हजरतगंज पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गौरव गर्ग हे यूपी कॅडरच्या आयपीएस अधिकारी रवीना त्यागी यांचे पती आहेत. रवीना त्यागी सध्या लखनऊमध्ये तैनात आहेत.
आयकर कार्यालय हजरतगंज परिसरातच आहे. गुरुवारी दोन अधिकाऱ्यांमधील भांडणात हे कार्यालय कुस्तीचा आखाडा बनलं होतं. उपायुक्त गौरव गर्ग आणि सहआयुक्त योगेंद्र मिश्रा समोरासमोर आले. प्रथम विभागीय वादावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. नंतर धक्काबुक्की आणि हाणामारी सुरू झाली, अशी सूत्रांकडू माहिती मिळाली आहे.
#लखनऊ में गजबे ही चल रहा है। अधिकारी-अधिकारी को ही कूटे डाल रहा है।
इनकम टैक्स के ऑफिस में IRS गौरव गर्ग को इनकम टैक्स के असिस्टेंट कमिश्नर ने कमरा बंद करके कूट दिया।
घायल गौरव गर्ग को सिविल अस्पताल पहुंचाया गया है, जहां उनका इलाज जारी है। pic.twitter.com/EQnIZatG6Y
— Devesh Pandey (@iamdevvofficial) May 29, 2025
सहआयुक्त योगेंद्र मिश्रा यांनी उपायुक्त गौरव गर्ग यांना कार्यालयातील एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे ते जखमी झाले. या हल्ल्यात गौरव गर्ग यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तथापि, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन्ही अधिकाऱ्यांमधील या हाणामारीमुळे या प्रकरणाला हायप्रोफाइल स्वरूप प्राप्त झालं आहे. हल्ल्याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसले तरी, हे प्रकरण विभागीय तणाव आणि परस्पर वादातून निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. गौरव गर्ग यांनी सहआयुक्त योगेंद्र मिश्रा यांच्याविरुद्ध हजरतगंज पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे..
या घटनेनंतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हजरतगंज पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे. माहिती मिळताच आयएएस एमडी राजशेखर आणि डीसीपी सेंट्रल आशिष श्रीवास्तव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी सांगितले की, गौरव गर्ग यांनी योगेंद्र मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अर्जाच्या आधारे गुन्हा दाखल केला जाईल. सध्या गौरव यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.