these 5 things will change from 1 november 2020 know all details
देशातील महागाई (inflation) दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. आता काही दिवसात सणासुदीचे दिवस येतील मात्र अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात (Commercial LPG Cylinder Price) दरात वाढ झाली आहे. आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत अशा सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1731.50 रुपये झाली आहे.
[read_also content=”RBI नं 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची दिली आणखी एक संधी, 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली मुदत! https://www.navarashtra.com/india/rbi-extended-last-date-for-exchange-of-2000-rupees-notes-nrps-464087.html”]
आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ झाली आहे. जर आपण राजधानी दिल्लीबद्दल बोललो तर आता अशा सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1731.50 रुपये झाली आहे.
[read_also content=”दिल्लीत इसिसचे तीन दहशतवादी; एनआयएने जाहीर केले तीन लाखांचे बक्षीस https://www.navarashtra.com/india/search-for-isis-terrorists-in-delhi-anti-terror-agency-announces-rs-3-lakh-reward-nrka-464115.html”]
यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा दिला होता. याअंतर्गत घरांमध्ये वापरल्या जाणार्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये झाली, जी आधी 1,103 रुपये होती. तसेच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 400 रुपयांचे गॅस अनुदान जाहीर करण्यात आले. त्याला आधीपासून 200 रुपये अनुदान मिळत होते. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ७०३ रुपयांना एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.