India-China: चीनचा धूर निघणार! ड्रॅगनच्या छाताडावर राफेल थेट...; IAF कडून 'एलओसी'वर विशेष तयारी
नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षात सीमेवर वाद झाले आहेत. चीन कायमच भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना आपण पहिले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भारताने आपली संरक्षण सिद्धता वाढवण्यावर भर दिला आहे. अनेक प्रकारची शस्त्रात्रे, लढू विमाने, एअर बेस तयार करण्यावर भर दिला आहे. भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सक्षम राहावे लागेल यासाठी भारत संरक्षण क्षेत्रात मोठे काम करत आहे. चीन सातत्याने भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आता भारताने एलओसीवर विशेष तयारी सुरु केली आहे. यामुळे चीनची चिंता वाढणार आहे.
भारत चीनच्या सीमेजवळ एक एअरफिल्ड तयार करत आहे. हा एअरबेस चीनपासून ५० किमी अंतरावर असणार आहे. त्यामुळे भारताची ताकद वाढणार आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताचा हा अत्याधुनिक एअरफिल्ड तयार होणार आहे. न्योमा येथे हा एअरफिल्ड तयार केला जात आहे. एअरफिल्डवरून भारताचे राफेल, सुखोई आणि अन्य लढाऊ विमाने उड्डाण करू शकणार आहेत.
न्योमा एअरफिल्ड १३,७०० फूट उंचीवर बांधला जात आहे. हा एअरफिल्ड चीनच्या सीमेजवळच असणार आहे. हा एअरफिल्ड भारताचा सर्वात उंच सुरक्षित एअरफिल्ड असणार आहे. प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत हा एअरफिल्ड तयार केला जात आहे. २.७ किलोमीटरचा रन-वे ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार आहे. लेह, थॉईस आणि न्योमा अशा तीन एअरफिल्डमुळे चीनवर लक्ष ठेवणे, युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यास त्वरित कार्यवाही करणे सोपे जाणार आहे.
न्योमा एअरफिल्डमध्ये काय आहे खास?
या नवीन अत्याधुनिक एअरफिल्डवर वाहतूक नियंत्रण भवन, शस्त्रात्रे कोठार, अत्यंत मजबूत असे आश्रय करण्याची सोय असणार आहे. या प्रोजेक्टवर एक महिला इंजिनिअर करत आहे. चीनच्या सीमेजवळ असणारा हा सर्वात आधुनिक एअरफिल्ड असणार आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. चीन करत असलेल्या घुसखोरीच्या कारवायांवर आता लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.
चीनच्या ‘या’ हालचालीमुळे भारताचा इलेक्ट्रॉनिक उद्योग धोक्यात
चीनने भारतावर अनेक अनौपचारिक व्यापार निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे भारताचा इलेक्ट्रॉनिक उद्योग धोक्यात आला आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक उद्योगाने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की याचा देशाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. भारताचा अंदाज आहे की ते आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरीस ३२ अब्ज डॉलर्सची स्मार्टफोन निर्यात साध्य करेल, परंतु चीनच्या कृतींमुळे हे लक्ष्य शक्य दिसत नाही. त्याच वेळी, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, भारताने ६४ अब्ज डॉलर्स किमतीची उत्पादने तयार केली आहेत.उद्योग संघटना इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने भारत सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चीनच्या कृतीचा एकमेव उद्देश भारताच्या पुरवठा साखळीवर परिणाम करणे आणि जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येणाऱ्या भारताला कमकुवत करणे आहे.
उद्योगासाठी मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, काय आहे योजना? जाणून घ्या
चीनच्या या निर्बंधांमुळे कंपन्यांचे खर्च वाढत आहेत. ICEA सदस्यांमध्ये Apple, Google, Motorola, Foxconn, Vivo, Oppo, Lava, Dixon, Flex आणि Tata Electronics सारख्या कंपन्या समाविष्ट आहेत.