Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan News: पाकिस्तानातील ‘हे’ मुस्लिमही भारतात येणार? CAA नेमक्या तरतुदी काय?

पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांवर हल्ले आणि छळाचा मोठा इतिहास आहे. पाकिस्तानी मीडियामध्येही अनेकदा या वृत्तांना दुजोरा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत अतिरेक्यांनी ५० हून अधिक अहमदिया मुस्लिमांची हत्या केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 03, 2025 | 03:47 PM
India-Pakistan News: पाकिस्तानातील ‘हे’ मुस्लिमही भारतात येणार? CAA  नेमक्या तरतुदी काय?
Follow Us
Close
Follow Us:
  • नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA बाबत एक नवीन घोषणा
  • पाकिस्तानातील अहमदिया मुस्लिम, ज्यांना तेथे गैर-मुस्लिम
  • CAA मध्ये याबद्दल काय आहेत तरतुदी

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA बाबत एक नवीन घोषणा केली आहे. पूर्वी या कायद्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2014 होती. परंतु आता ती 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून धार्मिक छळाला तोंड देऊन भारतात आलेल्या निर्वासितांना दिलासा मिळेल.

या कायद्याअंतर्गत हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि पारशी समुदायाचे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. परंतु पाकिस्तानातील अहमदिया मुस्लिम, ज्यांना तेथे गैर-मुस्लिम असल्याचे मानले जाते. मग हे मुस्लिमदेखील CAA अंतर्गत येऊ शकतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानातील अहमदिया मुस्लिम CAA अंतर्गत भारतात येऊन स्थायिक होऊ शकतात का? CAA मध्ये याबद्दल काय तरतुदी आहेत. याबाबत माहिती असणेही महत्त्वाचे आहे.

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

 

CAA कोणाला लागू होतो?

नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA हा त्या निर्वासितांना दिलासा देण्यासाठी आणण्यात आला होता. जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून धार्मिक छळाला तोंड देऊन भारतात आले आहेत. त्यात हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि पारशी समुदायाच्या लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याचा उद्देश, या देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक म्हणून राहणारे लोक भारतात येऊन सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगू शकतील. मुस्लिम समुदायाचा या कायद्यात समावेश करण्यात आलेला नाही. कारण या तीन देशांमध्ये इस्लाम हा बहुसंख्य धर्म आहे. त्यामुळे मुस्लिमांना तेथे धार्मिक छळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाही.

अहमदिया मुस्लिमांना अधिकार मिळतील का?

अहमदिया मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये गैर-मुस्लिम मानले जाते. त्यांना तेथे अधिकृतपणे मुस्लिम म्हणून मान्यता नाकारण्यात आली आहे. अहमदिया समुदायाला पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून सामाजिक आणि धार्मिक भेदभावाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, मोठा प्रश्न उद्भवतो की जेव्हा त्यांना पाकिस्तानमध्ये गैर-मुस्लिम मानले जाते. तर भारताच्या सीएएमध्ये त्यांचाही समावेश होईल का? परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या कायद्यात अहमदिया मुस्लिमांचा उल्लेख नाही. कायद्यात स्पष्टपणे म्हटले आहे की हा कायदा फक्त सहा धर्मांच्या लोकांसाठी आहे. म्हणून, अहमदिया मुस्लिम, जरी ते पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक स्थितीत असले तरी, सीएएच्या कक्षेत येत नाहीत.

MP village Lake stolen : मध्यप्रदेशात घडली अजब गोष्ट! चक्क गावातील तलावची झाली चोरी, 25 लाख रुपये गेले पाण्यात

 कोण आहेत अहमदिया मुस्लिम ?

मुस्लिम आणि अहमदिया यांच्यातील पहिला फरक म्हणजे मुस्लिम पैगंबर मुहम्मद यांना शेवटचे पैगंबर मानतात. तर अहमदिया मिर्झा गुलाम अहमद यांना त्यांचे पैगंबर मानतात. अहमदियाचे सध्याचे प्रमुख मिर्झा मसरूर अहमद आहेत. अहमदिया देखील स्वतःला मुस्लिम मानतात आणि इस्लामच्या सर्व मूलभूत तत्त्वांवर विश्वास ठेवतात. अहमदिया हा इस्लामच्या ७३ पंथांपैकी एक आहे. हा जगभरातील सर्वात वेगाने वाढणारा इस्लामिक समुदाय आहे. त्याचे अनुयायी २०० हून अधिक देशांमध्ये आहेत, ज्यांची एकूण संख्या २० दशलक्ष म्हणजेच दोन कोटी असल्याचा अंदाज आहे.

ज्या अहमदिया मुस्लिमांकडे दुहेरी नागरिकत्व आहे किंवा ज्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट नाही ते हजला जाऊ शकतात आणि जातात. तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी १९७४ मध्ये संविधानात सुधारणा करून त्यांना अल्पसंख्याक बिगर मुस्लिम बनवले. ही दुरुस्तीमुळे अहमदिया मुस्लिमांना हज करण्यास प्रतिबंधित करण्यात आली आहे. बहुतेक देशांमध्ये, जेव्हा अहमदिया लोक हजला जाण्यासाठी अर्ज करतात तेव्हा असे कोणतेही निर्बंध नाहीत. म्हणून अहमदिया मुस्लिम देखील इतर मुस्लिमांप्रमाणे हज आणि उमराहला जातात.

पाकिस्तानात त्यांचा सतत छळ

पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांवर हल्ले आणि छळाचा मोठा इतिहास आहे. पाकिस्तानी मीडियामध्येही अनेकदा या वृत्तांना दुजोरा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत अतिरेक्यांनी ५० हून अधिक अहमदिया मुस्लिमांची हत्या केली आहे. पाकिस्तानच्या संविधानात अहमदिया मुस्लिमांना मुस्लिम मानले जात नाही. त्यांना अल्पसंख्याक बिगर मुस्लिम धार्मिक समुदायाचा दर्जा देण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांवर ईशनिंदेचे गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत. ईशनिंदेच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास अहमदिया समुदायाच्या लोकांची हत्या केली जाते.

 

Web Title: India pakistan news these minority muslims from pakistan will also come to india what are the exact provisions of caa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 03:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.