DRONE ( फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले. भारतीय वायूदलाने काल रात्रभर लाहोर, इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांवर द्रोण हल्ले करून अनेक भाग बेचिराख केले होते. तरीही पाकिस्तानची मस्ती काही जिरली नाही आहे. आता पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या चंदिगढ परिसरात पाकिस्तानी सैन्याचे पाच ड्रोन शिरले आहेत. त्यापूर्वी चंदीगढमध्ये सायरन वाजतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. चंदीगढमध्ये आतापर्यंत पाच ड्रोन शिरल्याची माहिती समोर आली आहे.
“हाच पाकिस्तानचा खरा चेहरा”, ऑपरेशन सिंदूरनंतर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
पाकिस्तानने आणखी किती ड्रोन्स चंदीगढमध्ये पाठवले आहते. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पाकिस्तानकडून सोडण्यात येणारे ड्रोन्स भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन वाजले आहेत. त्यामुळे सर्वांनी घरातच राहावं, आणि बाहेर बाल्कनीत थांबू नये अशी सूचना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. काळ रात्री झालेल्या हल्ल्यात भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानी लष्कराचे ६० ड्रोन्स आणि ४५ क्षेपणास्त्रं पाडली होती.
पाकिस्तानी सैन्याकडून कालपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले-
पाकिस्तानी सैन्याकडून काल रात्रीपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले चढवले जात आहेत. त्यासाठी रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतांश हवाई हल्ले परतावून लावले आहेत. यामध्ये एस 400 एअर डिफेन्स सिस्टीम आणि एल 70 गन, Zu-23mm या अँटी एअरक्राफ्ट मशीनगन्स आणि शिल्का यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा सीमारेषेवर हल्ला सुरु केला आहे. बारामुल्ला परिसरात पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्तीवर गोळीबार केला आहे. या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
सर्वात मोठा आणि निर्णायक हल्ला
दरम्यान, या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सध्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी बैठक सुरु आहे. यानंतर भारत पाकिस्तानवर सर्वात मोठा आणि निर्णायक हल्ला करु शकतो. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.