Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय? आर्मी अलर्ट तर ATS घटनास्थळी दाखल

अहमदाबादवरून लंडनला  जाणारे विमान कोसळले.  उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळले. हे विमान लष्कराच्या कॅन्टोन्मेंटच्या जवळपास कोसळल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 12, 2025 | 07:35 PM
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय? आर्मी अलर्ट तर ATS घटनास्थळी दाखल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय? आर्मी अलर्ट तर ATS घटनास्थळी दाखल

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद: आज अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईन विमान मेघानीनगर भागात कोसळले. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बीजे मेडिकल हॉस्टेलवर कोसळले. या विमानातील 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. त्यातच यह अपघात होता की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे. हा विमान अपघात लष्करी कॅन्टोन्मेंटच्या जवळपास घडल्याचे म्हटले जात आहे.

अहमदाबादवरून लंडनला  जाणारे विमान कोसळले.  उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळले. हे विमान लष्कराच्या कॅन्टोन्मेंटच्या जवळपास कोसळल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

हा अपघात झाल्यानंतर आता लष्कर देखील सतर्क झाले आहे. ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा कट तर नव्हता अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) दाखल झाले आहे. तसेच शीघ्र कृती दल, रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत.

अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट

अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.

Ahmedabad Plane Crash: हृदयद्रावक! अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू?

लंडनला का चालले होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री?

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे अहमदाबादवरून लंडनला चालले होते. विजय रूपाणी यांची पत्नी लंडनला असल्याचे समजते आहे. विजय रूपाणी हे आपल्या पत्नीला लंडनवरून आणण्यासाठी चालले होते. विजय रूपाणी यांची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये असल्याचे समजते आहे. पत्नीला आणण्यासाठी रूपाणी चालले होते. ते ज्या विमानाने लंडनला चालले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विजय रूपाणी हे सीट नंबर ‘2 डी’ वर बसले होते असे सांगितले जात आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.

Ahmedabad Plane Crash: हृदयद्रावक! अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

मुरलीधर मोहोळ यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधून सामान्य नागरिकांना आवाहन देखील केले आहे. सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, काही वेळापूर्वी दुपारच्या सुमारास विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली. एअर इंडियाचे 171 हे अहमदाबादहून लंडनला जायला निघालेले विमान कोसळले. अपघात झालेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. आमच्या मंत्रालयामध्ये देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री राममोहन नायडू तिथे पोहचले आहेत. मी पण तिथेच जात आहे. जे लोक तिथे अडकले आहेत किंवा जखमी आहेत त्यांना तातडीने बाहेर काढून मदत करणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे मत खासदार व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: Indian army and gujarat ats alert mode after ahmedabad plane crash accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 07:23 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • ats
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
1

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी
2

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
3

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

मोठी बातमी! अनर्थ टळला; मुंबई एअरपोर्टवर Spicejet च्या विमानाने उड्डाण घेतले अन् बाह्य चाक…
4

मोठी बातमी! अनर्थ टळला; मुंबई एअरपोर्टवर Spicejet च्या विमानाने उड्डाण घेतले अन् बाह्य चाक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.