Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

अहिल्यानगरमध्ये भल्या पहाटे नाशिक व मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाकडून छापेमारी करण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात, ही छापेमारी कुठे करण्यात आली.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 08:40 PM
भल्या पहाटे 'एटीएस'कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

भल्या पहाटे 'एटीएस'कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये ‘एटीएस’कडून छापेमारी
  • मुकुंदनगर व सावेडी उपनगरातील सूर्यनगर परिसरात सात ठिकाणी छापे
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
राज्यातील दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची (ATS) स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य दहशतवादी कट, अतिरेकी संघटनांशी संबंधित हालचाली, संशयास्पद आर्थिक व्यवहार तसेच शस्त्रसाठा यांचा शोध घेणे आणि त्यावर तातडीने कारवाई करणे हे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून ATS कार्य करते. नुकतेच या पथकाने अहिल्यानगर शहरात छापेमारी केली आहे.

दहशतवादविरोधी कारवायांशी संबंधित असल्याच्या संशयावरून नाशिक व मुंबई येथील दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर आणि सावेडी उपनगरातील सूर्यनगर परिसरात एकूण सात ठिकाणी छापे टाकले. पहाटे चारच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई दुपारपर्यंत सुरू होती.

Panvel News: पनवेलची तहान भागवण्यासाठी शिलार-पोशीर धरणांना हिरवा कंदील

कारवाईदरम्यान पथकाने स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात बंद दाराआड चौकशी आणि तपासणी केली. काही ठिकाणी सकाळी दहा वाजेपर्यंत, तर काही ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत तपास सुरू होता. पंचनामे करून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तपासादरम्यान काही घरांमधून तलवारी, चाकू आणि एक एअर गन जप्त करण्यात आली. जप्त साहित्य भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुकुंदनगरमधील कारवाईनंतर एटीएसचे एक पथक सावेडी उपनगरातील सूर्यनगर परिसरातही चौकशीसाठी गेले होते.

दरम्यान, या कारवाईबाबत सायंकाळपर्यंत एटीएसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. शहरात दिवसभर या छाप्यांची जोरदार चर्चा सुरू होती.

Central Railway : अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

शस्त्रप्रकरणी गुन्हा दाखल

जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांप्रकरणी अमीर हमजा जफर शेख (वय २१, रा. नॅशनल कॉलनी, दर्गा दायरा रोड, मुकुंदनगर) आणि असद जुबेर सय्यद (रा. नवेद कॉम्प्लेक्स, इनाम मशिदसमोर, मुकुंदनगर) यांच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Ahilyanagar news early morning raid by ats in mukundnaagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • ats
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.