Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu-Kashmir News: जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

अमित शाह यांनी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, दहशतवाद्यांचे अस्तित्व  पूर्णतः नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2025 | 04:41 PM
Jammu-Kashmir News: जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या 7  दहशतवाद्यांना कंठस्नान
Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-कश्मीर:  जम्मू-कश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत घुसखोरी करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना ठार मारले. या कारवाईत २ ते ३ पाकिस्तानी सैनिक देखील सामील होते. ही घटना  ४-५ फेब्रुवारीच्या रात्री नियंत्रण रेषेवर (LOC) घडली.

पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने हल्ल्याची तयारी

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिल्लेल्या अहवालानुसार, हे घुसखोर पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) सोबत मिळून भारतीय सुरक्षादलांवर घातपात करण्याच्या तयारीत होते. पाकिस्तानी BAT कडून यापूर्वी देखील भारतीय सैनिकांवर छुप्या हल्ल्यांचे प्रयत्न करत आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासोबत काश्मीरसह सर्व मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Arvind Kejriwal on BJP: आमच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी भाजपचे फोन; केजरीवालांचा भाजपवर गंभीर आरोप

अल-बदर संघटनेचे दहशतवादी ठार

या कारवाईत मारल्या गेलेल्या घुसखोरांमध्ये हशतवादी संघटना ‘अल-बदर’चे सदस्य देखील होते. विशेष म्हणजे, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लाहोरमध्ये झालेल्या एका रॅलीत दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने भारताविरोधात भडकाऊ भाषण दिले होते. त्याने काश्मीरला ‘मुक्त’ करण्याचा’ उल्लेख केला होता.

गृहमंत्र्यांकडून घुसखोरी रोखण्यासाठी कठोर निर्देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ५ फेब्रुवारीला सर्व सुरक्षा यंत्रणांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले होते.  त्यांचे स्पष्ट मत होते की  घुसखोरी पूर्णतः शून्यावर आणण्याचे लक्ष्य पूर्ण केले पाहिजे. अमित शाह यांनी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, दहशतवाद्यांचे अस्तित्व  पूर्णतः नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, मादक पदार्थांच्या तस्करीचे नेटवर्कही या घुसखोर आणि दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Delhi Assembly Election 2025: राजकारण तापणार…! भाजपच्या तक्रारीनंतर ACBचे पथक अरविंद केजरीवालांच्या घरी

उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक (DGP) नलिन प्रभात, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर वरिष्ठ सैन्य, पोलीस व नागरी अधिकारी सहभागी झाले होते. ही कारवाई भारतीय सुरक्षादलांसाठी मोठे यश असून, घुसखोरी थांबवण्यासाठी भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

Web Title: Indian army kills seven terrorists who infiltrated into indian territory nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • jammu kashmir

संबंधित बातम्या

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…
1

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

Kulgam Terror Attack: मोठी बातमी! कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ सैनिक जखमी
2

Kulgam Terror Attack: मोठी बातमी! कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ सैनिक जखमी

Jammu-Kashmir Politics: जम्मू-श्रीनगर महामार्ग चौथ्या दिवशी ३७०० वाहने अडकली; मुघल रोड पुन्हा सुरू
3

Jammu-Kashmir Politics: जम्मू-श्रीनगर महामार्ग चौथ्या दिवशी ३७०० वाहने अडकली; मुघल रोड पुन्हा सुरू

जम्मू-काश्मीरवर निसर्गाची वक्रदृष्टी; पूर अन् भूस्खलनामध्ये २५०० रस्ते खचले, 100 कोटींहून अधिक नुकसान
4

जम्मू-काश्मीरवर निसर्गाची वक्रदृष्टी; पूर अन् भूस्खलनामध्ये २५०० रस्ते खचले, 100 कोटींहून अधिक नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.