Photo Credit- Social Media आम आदमी पक्षाने (AAP) सोमवारी (२७ जानेवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे ४८ तास शिल्लक असतानाच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आतापर्यंत त्यांच्या १६ उमेदवारांना भाजपकडून फोन आले असून, मंत्रीपद आणि १५-१५ कोटी रुपये देण्याचे प्रलोभन दिले जात आहे. उमेदवारांना “आप” सोडून भाजपमध्ये येण्याचा दबाव टाकला जात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “काही एजन्सी दाखवत आहेत की भाजपला ५५ पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. जर भाजपला इतक्या जागा मिळत असतील, तर मग आमच्या उमेदवारांना फोडण्यासाठी फोन का केले जात आहेत?” हे सर्वेक्षण दिशाभूल करणारे असून, दिल्लीतील वातावरण भाजपच्या बाजूने करण्यासाठी आणि “आप”च्या उमेदवारांना प्रभावीत करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
जगात नसली तरी मनात राहील! कारमध्ये गर्लफ्रेंडचा फोटो अन् फुलांचा गुच्छ ठेवत
आपच्या सर्व 70 उमेदवारांची बैठक
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी, आज आम आदमी पक्षाने (AAP) आपल्या सर्व 70 उमेदवारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भूषवणार आहेत. ही बैठक आज सकाळी 11:30 वाजता पार पडणार आहे.
सुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार आणि दिल्लीचे मंत्री मुकेश अहलावत यांनी दावा केला आहे की, त्यांना देखील भाजपकडून पक्ष सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
मुकेश अहलावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत म्हटले, “मी मरू शकतो, माझे तुकडे होऊ शकतात, पण मी अरविंद केजरीवाल यांची साथ कधीच सोडणार नाही. मला सांगण्यात आले की, भाजपचे सरकार बनत आहे, आणि मी जर ‘आप’ सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश केला, तर ते मला मंत्रीपद आणि १५ कोटी रुपये देतील. पण केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने मला दिलेला सन्मान, तो मी शेवटच्या श्वासापर्यंत टिकवेन.”
Bianca Censori: ग्रॅमीमध्ये बोल्ड ड्रेसने खळबळ उडवणारी बियांका अडचणीत, होणार का
आपचे खासदार संजय सिंग यांनी गुरुवारी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, भाजपला पुन्हा दिल्लीमध्ये सत्ता मिळणार नाही, त्यामुळे आता ते ‘आप’चे उमेदवार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांनी दावा केला की, AAP चे सात उमेदवार भाजपच्या संपर्कात असून त्यांना १५-१५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे.
संजय सिंग यांनी सर्व उमेदवारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. “भाजपकडून कोणताही कॉल आला तर त्याची रेकॉर्डिंग करा. जर कोणी प्रत्यक्ष भेटून पैशांचा प्रस्ताव देत असेल, तर त्याचा हिडन कॅमेराने व्हिडिओ बनवा.” यापूर्वीही, २०१३ मध्ये ‘आप’ने असा दावा केला होता की, भाजप त्यांचे उमेदवार फोडण्यासाठी २०-२० कोटी रुपयांची ऑफर देत आहे. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ४९ दिवसांची सरकार चालवून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
संजय सिंग यांनी भाजपवर टीका करत सांगितले की, “मतमोजणीपूर्वीच भाजपने पराभव मान्य केला आहे. संपूर्ण देशात भाजप आमदार आणि खासदार फोडण्याचे राजकारण करत आहे. २०१३ च्या निवडणुकीनंतर भाजप नेते शेरसिंह डागर यांनी ‘आप’च्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही असे प्रयत्न वारंवार झाले. पंजाबमध्ये भाजपने ‘आप’च्या खासदाराला पक्षात घेतले, तसेच दिल्लीतील दोन मंत्र्यांना भाजपमध्ये सहभागी करून घेतले. त्यामुळे भाजप दिल्लीतील ‘आप’ सरकार पाडण्याचा प्रयत्न करू शकते.”