Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ज्यांनी भारतावर राज्य केलं, आता त्याच ब्रिटनचा..,” दिग्गजांच्या प्रतिक्रिया

१६०८ साली इस्ट इंडिया कंपनी सुरतच्या बंदरावर भारतात आली. ४१४ वर्षांनंतर आता ऐन दिवाळीच्या दिवशीच ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. वेळेनुसार सगळं बदलत असतं. दिवाळीच्या शुभेच्छा, असे चेतन भगत म्हणाला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 24, 2022 | 09:27 PM
“ज्यांनी भारतावर राज्य केलं, आता त्याच ब्रिटनचा..,” दिग्गजांच्या प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनच्या पतंप्रधानपदी कोण विराजमान होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक असल्यामुळे समस्त भारतीयांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. दरम्यान, ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाने ऋषी सुनक यांची पक्षाचा नेता म्हणून निवड केली असून ते ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. लवकरच लिझ ट्रस यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.

दरम्यान, सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच भारतातील दिग्गज व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या ब्रिटिशांनी भारतावर कित्येक वर्षे राज्य केलं, आता त्याच भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनचा कारभार पाहणार आहे, अशी भावना प्रसिद्ध लेखक चेतन भगत तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली आहे.

१६०८ साली इस्ट इंडिया कंपनी सुरतच्या बंदरावर भारतात आली. ४१४ वर्षांनंतर आता ऐन दिवाळीच्या दिवशीच ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. वेळेनुसार सगळं बदलत असतं. दिवाळीच्या शुभेच्छा, असे चेतन भगत म्हणाला आहे.

तर ज्यांनी भारतावर कित्येक वर्षे राज्य केले, त्याच राज्याचा कारभार आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक पाहतील. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली आहे. ब्रिटनच्या पहिल्या हिंदू पंतप्रधानांना शुभेच्छा, असे अग्नीहोत्री म्हणाले आहेत.

दरम्यान, सत्ताधारी हुजूर पक्षाच्या ‘१९९२ समिती’ने सुनक यांना पक्षाचा नेता म्हणून घोषित केले आहे.याआधी ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता.

जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. मात्र सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे शेवटी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनक हे मागील सात महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान आहेत. हंगामी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडून ते पंतप्रधापदाचा पदाभार स्वीकारतील.

Web Title: Indian origin rishi sunak become prime minister of united kingdom indian celebrity chetan bhagat vivek agnihotri congratulated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2022 | 09:27 PM

Topics:  

  • vivek agnihotri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.