Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pallavi Joshi-Vivek Agnihotri: अभिनेत्री पल्लवी जोशींच्या घरी रॉकेटमुळे सोफ्याला आग; विवेक अग्निहोत्रींनची पोस्ट चर्चेत, काय घडलं?

Pallavi Joshi-Vivek Agnihotri: पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांच्या घराच्या बाल्कनीतील सोफ्याला दिवाळीत रॉकेटमुळे आग लागली. फटाक्यांविरोधात पोस्ट केल्यानंतर विवेक यांनी ती डिलीट केली. आता कारणही सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2026 | 02:01 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pallavi Joshi-Vivek Agnihotri:  दिवाळी म्हटलं की दिवे, रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र, फटाक्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटनाही घडतात. अशीच एक घटना मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि त्यांचे पती, प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या घरी घडली. दिवाळीदरम्यान रॉकेट थेट त्यांच्या घराच्या बाल्कनीत पडल्याने सोफ्याला आग लागली. या घटनेनंतर विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फटाक्यांच्या आतषबाजीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. आता पोस्ट हटवण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रॉकेटमुळे बाल्कनीतील सोफ्याला लागली आग

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत या घटनेची माहिती दिली होती. त्यांनी मुंबईच्या महापौरांना उद्देशून लिहिले होते, “प्रिय महापौर मॅडम, काल रात्री आमच्या बाल्कनीतील सोफ्याला आग लागली.” रॉकेट सोफ्यावर पडल्याने ही आग लागल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या निमित्ताने त्यांनी फटाक्यांमुळे होणाऱ्या धोक्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

फटाके फोडण्यावर विवेक अग्निहोत्रींनी उपस्थित केले प्रश्न

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये दिवाळी साजरी करण्याबाबत कोणाचाही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, फटाके फोडणे हा आपल्या संस्कृतीचा भाग कधीच नव्हता, असे मत त्यांनी मांडले. आपली संस्कृती कोणाचाही जीव किंवा घर धोक्यात घालण्याची शिकवण देत नाही, असेही त्यांनी म्हटले.

याशिवाय, त्यांनी प्रशासनाच्या जबाबदारीवरही प्रश्न उपस्थित केले. अग्निसुरक्षेची खात्री करणे, न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईतील आगीच्या घटनांची चौकशी करून जिथे निष्काळजीपणा आढळेल, तिथे जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.

I am deleting my previous tweet. Neither do I want to be the reason for anyone’s outrage nor do I want to enable or weaken anyone’s cultural or environmental narrative. Happy Diwali to everyone, once again.
🇮🇳 🪔
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 9, 2026

Yash Ravan Look: ३३ किलोचे कवच अन् १.८ किलोचा मुकुट; ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कठोर मेहनत

पोस्ट डिलीट करण्यामागचे कारण काय?

या घटनेबाबत केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ती डिलीट केली. त्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत यामागचे कारण स्पष्ट केले. त्यांनी लिहिले, “मी माझे जुने ट्विट हटवत आहे. मला कोणाचाही रोष ओढवून घ्यायचा नाही. मला कोणाच्याही सांस्कृतिक किंवा पर्यावरणीय कथनाला मोठेपणा द्यायचा नाही किंवा त्यात फेरफार करायचा नाही.”

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांच्या पहिल्या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे सोफ्याला आग लागण्याच्या घटनेसोबतच त्यांनी पोस्ट डिलीट करण्याचा घेतलेला निर्णयही चर्चेचा विषय ठरला आहे.

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

Web Title: Pallavi joshi vivek agnihotri house sofa firecracker fire deleted post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Pallavi Joshi
  • vivek agnihotri

संबंधित बातम्या

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!
1

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!
2

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय
3

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व
4

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.