
कलकत्ता : देशात न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांना निकाल येईपर्यंत वर्षानुवर्षाचा कालावधी लागतो. मात्र, पश्चिम बंगाल (West Bengal) एक असं प्रकरण सध्या चर्चेत आहे ज्याचा निकाल यायला 72 वर्षाचा कालावधी लागला. भारतातील सर्वात जुने प्रकरण (Indias oldest Case) कलकत्ता उच्च न्यायालयाच्या (Calcutta High Court) सर्वात जुन्या खंडपीठाने अखेर निकाली काढले आहे. बेरहामपूर बँक लिमिटेडच्या लिक्विडेशन प्रक्रियेशी (berhampur bank liquidation) संबंधित खटला होता. विषेश म्हणजे, विद्यमान सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या जन्माच्या दशकभरापूर्वी बेरहामपूर बँकेशी संबंधित हा खटला दाखल झाला होता.
[read_also content=”एकनाथ शिंदेंनी आधी राज्याबाहेर गेलेले प्रकल्प परत आणावेत, जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीला गेलेल्या मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचा टोला! https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-should-bring-back-the-projects-that-went-outside-the-state-first-sanjay-raut-criticized-on-cm-nrps-362026.html”]
बेरहामपूर बँक बंद करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका 1 जानेवारी 1951 रोजी दाखल करण्यात आली आणि त्याच दिवशी ‘केस क्रमांक 71/1951’ म्हणून नोंदवण्यात आली. कर्जदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी बर्हामपूर बँकेवर अनेक खटले होते. यापैकी अनेक कर्जदारांनी बँकेच्या दाव्याला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील उर्वरित तीन सर्वात जुन्या प्रकरणांपैकी, बंगालमधील मालदा येथील दिवाणी न्यायालयात दोन दिवाणी खटले सुरू आहेत आणि एक मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी मालदा येथील न्यायालयांनी या वर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीडमध्ये बेरहामपूर प्रकरणाचा उल्लेख 9 जानेवारीपर्यंत कोणत्याही भारतीय न्यायालयात सुनावणी झालेला सर्वात जुना खटला म्हणून करण्यात आला आहे.