Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal SIR:  पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ७ बड्या अधिकारी तडकाफडकी निलंबित

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल्याच्या मुख्य सचिवांना या अधिकाऱ्यांविरूद्ध विभागीय शिस्तभांगाची कारवाई कऱण्याचे आदेश दिले आहे. तसेच  उशीर न करता या कारवाईची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 16, 2026 | 11:13 AM
Baramati By Election.

Baramati By Election.

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगांलमधील  सात अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निंलंबित
  • केंद्रीय  निवडणूक आयोगाची कारवाई
  • मतदार यादीची पुनरावृत्ती ही एक संवेदनशील आणि महत्त्वाची प्रक्रिया
West Bengal SIR:  पश्चिम बंगालधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राजकारण आणखी तापत जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.  अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI)  पश्चिम बंगांलमधील  सात अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निंलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष सघन सुधारणा (SIR) अंतर्गत मतदार यादीच्या छाननीदरम्यान गंभीर गैरवर्तन, कर्तव्यात कसूर आणि अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांवर  ही कारवाई करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम १३CC अंतर्गत आयोगाने ही कारवाई  केल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  निलंबित अधिकाऱ्यांमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) डॉ. सेफौर रहमान, फरक्का विधानसभा मतदारसंघाचे AERO नितीश दास, मयनागुरी विधानसभा मतदारसंघाचे AERO दलिया रे चौधरी, सुती विधानसभा मतदारसंघाचे AERO एसके मुर्शिद आलम, कॅनिंग पूर्व विधानसभा मतदारसंघाचे दोन AERO (सत्यजित दास आणि जॉयदीप कुंडू) आणि डेब्रा विधानसभा मतदारसंघाचे AERO देबाशिष बिस्वास यांचा समावेश आहे.

CBSE Board Exam 2026: सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्रावर कोणते कपडे घालावे? ड्रेसपासून चपलांपर्यंत जाणून घ्या नियम

मुख्य सचिवांना देण्यात आलेले निर्देश

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल्याच्या मुख्य सचिवांना या अधिकाऱ्यांविरूद्ध विभागीय शिस्तभांगाची कारवाई कऱण्याचे आदेश दिले आहे. तसेच  उशीर न करता या कारवाईची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि पारदर्शकता राखणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. असेही आयोगान म्हटलं आहे.

मतदार यादीची पुनरावृत्ती (SIR) ही एक संवेदनशील आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अपात्र मतदारांना यादीतून काढून टाकणे आणि पात्र मतदारांना समाविष्ट करणे समाविष्ट आहे. या प्रक्रियेतील कोणताही निष्काळजीपणा निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेला धोका निर्माण करू शकतो, असंही आयोगाकडू सांगण्यात आले आहे.

TCS Market Cap Falls: टीसीएसला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटींची झाली घसरण.. जाणून घ्या सविस्तर 

निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही

याशिवाय, ही कारवाई निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे,  निवडणूक कामात कोणतीही अनियमितता किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.   आगामी निवडणुकांसाठी आयोगाच्या तयारीचा हा एक भाग असल्याचा अस्पष्ट संदेशही या कारवाईतून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक आज, १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आसामला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान, निवडणूक आयोग विविध राजकीय पक्ष, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेईल आणि निवडणूक व्यवस्थेचा आढावा  घेणार आहे,.

 

 

Web Title: West bengal sir 7 officials from west bengal suspended in election commission action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Chief Minister Mamata Banerjee
  • National Politics
  • SIR
  • West bengal

संबंधित बातम्या

OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी
1

OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी

PCMC SIR Campaign 2026: भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे मतदार पडताळणी
2

PCMC SIR Campaign 2026: भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे मतदार पडताळणी

‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार
3

‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.