Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय नौदलात दाखल होणार INS Nistar ; ड्रॅगनवर असणार करडी नजर, काय आहेत वैशिष्ट्ये?

विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेल्या INS निस्तार या डायव्हिंग सपोर्ट वेसल (DSV) ला अधिकृतपणे नौदलात समाविष्ट करण्यात येणार आहे. 18 जुलै रोजी यांचं उद्घाटन होणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 17, 2025 | 10:08 PM
भारतीय नौदलात दाखल होणार INS Nistar ; ड्रॅगनवर असणार करडी नजर, काय आहेत वैशिष्ट्ये

भारतीय नौदलात दाखल होणार INS Nistar ; ड्रॅगनवर असणार करडी नजर, काय आहेत वैशिष्ट्ये

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय नौसेनेच्या स्वदेशी क्षमतांना अधिक बळकटी देणारा एक ऐतिहासिक क्षण 18 जुलै रोजी घडणार आहे. विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेल्या INS निस्तार या डायव्हिंग सपोर्ट वेसल (DSV) ला अधिकृतपणे नौदलात समाविष्ट करण्यात येणार आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडच्या विशाखापट्टणम यार्डमध्ये तयार करण्यात आलेल्या या जहाजामुळे भारताच्या सागरी सुरक्षा क्षमतेत मोठी भर पडणार आहे.

ड्रॅगन सुधारणार नाहीच! रोबोट डॉग आणि हायटेक शास्त्रांसह भारतीय सीमेजवळ चीनचा पुन्हा युद्धसराव

‘निस्तार’ हे नाव संस्कृत शब्दातून घेतले असून त्याचा अर्थ “मुक्ती”, “बचाव” किंवा “मोक्ष” आहे. हे जहाज खोल समुद्रात पनडुब्ब्यांवरील आपत्कालीन परिस्थितींमध्ये मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण धोरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.INS निस्तार हे जहाज गडद समुद्रात 60 दिवसांपेक्षा अधिक काळ तळाशी काम करण्यास सक्षम असून, ते विशेषतः पनडुब्बी बचाव मोहिमांमध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहे. हे जहाज ‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसल’ (DSRV) साठी मदरशिप म्हणून काम करेल, ज्यामुळे खोल समुद्रात अडकलेल्या नौसैनिकांना बाहेर काढणे शक्य होईल.

या जहाजाची रचना अत्याधुनिक गोताखोरी उपकरणांनी युक्त असून, यामध्ये एक प्रगत डाइविंग कॉम्प्लेक्सही बसवण्यात आलेला आहे. INS निस्तारचे वजन सुमारे 10,500 टन असून, याची लांबी सुमारे 120 मीटर आणि रुंदी 20 मीटर इतकी आहे. हे जहाज 300 मीटर खोल समुद्रात सॅचुरेशन डाइविंग करण्यास पूर्ण सक्षम आहे. यामध्ये 75 मीटर पर्यंत डाइविंगसाठी स्वतंत्र साइड डाइविंग स्टेज देखील आहे.

INS निस्तारमध्ये पाण्यातील बचाव कार्यांसाठी ‘रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल’ (ROV), साइड स्कॅन सोनार, आणि 15 टन क्षमतेची सबसी क्रेन यांसारखी उपकरणे बसवण्यात आली आहेत. यामुळे जलतळाशी तपासणी, वस्तूंची शोध मोहीम आणि बचावकार्य अधिक अचूक आणि परिणामकारक होणार आहे. विशेष म्हणजे या जहाजावर हेलिकॉप्टर लँडिंगचीही सुविधा उपलब्ध आहे, जी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसादासाठी उपयुक्त ठरणार आहे.

INS निस्तारची नियुक्ती भारतीय नौदलाच्या पूर्वी नौसेना कमांडमध्ये करण्यात येणार आहे. या विभागात हे जहाज खोल समुद्रात डाइविंग आणि पनडुब्बी बचाव कार्यांमध्ये सक्रिय भूमिका बजावेल.गेल्या काही वर्षांमध्ये हिंद महासागरात चिनी पनडुब्ब्यांच्या वाढत्या हालचालींमुळे भारतासाठी नवी सुरक्षा चिंता निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर INS निस्तारसारखे स्वदेशी जहाज ‘ड्रॅगन’वर नजर ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा सागरी प्रहरी ठरणार आहे.

Dan Rivera Death : प्रसिद्ध पॅरानॉर्मल संशोधकाचा गूढ मृत्यू; ‘ॲनाबेल’ या हॉन्टेड बाहुलीसोबत करत होते प्रवास

विशेष म्हणजे, INS निस्तार याआधीच्या स्वरूपात 1969 मध्ये सोव्हिएत संघाकडून विकत घेण्यात आलेला पनडुब्बी बचाव पोत होता, ज्याची 1971 मध्ये भारतीय नौदलात नेमणूक झाली होती. आता त्याच्याच नावाने पूर्णपणे भारतात बनवलेला एक अत्याधुनिक वेसल नौदलात दाखल होत आहे — हा एक प्रकारे भारताच्या नौदल इतिहासातील सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल.

Web Title: Ins nistar join soon indian navy fleet first indigenous diving support vessel specialty know it features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 10:06 PM

Topics:  

  • Indian Armed Forces
  • Indian Navy

संबंधित बातम्या

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?
1

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?

भारतीय नौदलात अप्रेन्टिस भरती! १३०० हून अधिक रिक्त पदे भरणार, आजपासूनच करा अर्ज
2

भारतीय नौदलात अप्रेन्टिस भरती! १३०० हून अधिक रिक्त पदे भरणार, आजपासूनच करा अर्ज

भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्टपर्यंत वाढवली
3

भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्टपर्यंत वाढवली

नेव्ही अग्निवीर MR म्युझिशियन 2025 प्रवेशपत्र जाहीर; उमेदवारांनी लगेच डाऊनलोड करा
4

नेव्ही अग्निवीर MR म्युझिशियन 2025 प्रवेशपत्र जाहीर; उमेदवारांनी लगेच डाऊनलोड करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.